संत गजानन महाराज पालखीचे सहा जूनला पंढरपूरकडे प्रस्‍थान

श्रींच्‍या पालखीचे पंढरपूर पायदळ वारीचे यंदा हे ५३ वे वर्ष आहे. पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्‍हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्‍मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमीटर प्रवास करून ८ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल. तेथे ८ ते १२ जुलैपर्यंत मुक्‍काम केल्यानंतर १३ जुलै रोजी सकाळी काल्‍याचा कार्यक्रम झाल्‍यावर श्रींची पालखी शेगावसाठी परतीच्‍या मार्गाला लागेल
Sant Gajanan Maharaj
Sant Gajanan Maharaj Agrowon
Published on: 
Updated on: 

शेगाव, जि. बुलडाणा ः यंदाच्या आषाढीनिमित्त होणाऱ्या पंढरपूर यात्रेसाठी शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी सहा जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोना काळामुळे मागील दोन वर्षे पालखी सोहळा रद्द होता. श्रींच्‍या पालखीचे पंढरपूर पायदळ वारीचे यंदा हे ५३ वे वर्ष आहे. पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्‍हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्‍मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमीटर प्रवास करून ८ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल. तेथे ८ ते १२ जुलैपर्यंत मुक्‍काम केल्यानंतर १३ जुलै रोजी सकाळी काल्‍याचा कार्यक्रम झाल्‍यावर श्रींची पालखी शेगावसाठी परतीच्‍या मार्गाला लागेल

असा आहे पालखीचा कार्यक्रम
६ जून रोजी सकाळी श्री क्षेत्र शेगाव येथून प्रस्‍थान, त्यानंतर श्री क्षेत्र नागझरी, पारस, ७ जूनला गायगाव, भौरद, ८ व ९ जूनला अकोला मुक्काम. १० जून भरतपूर, वाडेगाव, ११ जून देऊळगाव, पातूर, १२ जून मेडशी, श्रीक्षेत्र डव्हा, १३ जून मालेगाव, शिरपूर जैन, १४ जून चिंचाबा पेन, म्हसला पेन, १५ जून किनखेडा, रिसोड, १६ जून पानकन्हेरगाव, सेनगाव, १७ जून श्रीक्षेत्र नरसी, डिग्रस, १८ जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ, जवळा बाजार, १९ जून हट्टा, श्री क्षेत्र त्रिभारा, २० जून परभणी, २१ जून ब्राह्मणगाव, दैठणा, २२ जून खळी, गंगाखेड, २३ जून वडगाव, (दादा हरी), परळी थर्मल, २४ जून परळी, परळी वैजनाथ, २५ जून कन्हेरवाडी, अंबाजोगाई, २६ जून लोखंडी सावरगाव, बोरी सावरगाव, २७ जून गोटेगाव, कळंब, २८ जून गोविंदपूर, तेरणा साखर कारखाना, २९ जून किनी, उपळा माकडाचे, ३० जून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर उस्मानाबाद, उस्‍मानाबाद, १ जुलै वडगाव सिध्देश्वर, श्री क्षेत्र तुळजापूर, २ जुलै सांगवी, उळे, ३ व ४ जुलै सोलापूर, ५ जुलैला सोलापूर, तिऱ्हे, ६ जुलै कामती खुर्द (वाघोली), माचणूर, ७ जुलै ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा आणि ८ जुलैला पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com