Wet Drought : सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
Wet Drought
Wet DroughtAgrowon
Published on: 
Updated on: 

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना हे निवेदन दिले.

Wet Drought
Crop Damage : तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या

निवेदनात म्हटले, की जिल्ह्यातील कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्‍वर, खटाव व कऱ्हाड तालुक्यांत परतीच्या पावसामुळे सुमारे ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा, पाटण, जावळी, वाई, फलटण आणि खंडाळा तालुक्यांत परतीच्या पावसाने १५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Wet Drought
Crop Damage : परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा

यामध्ये काढणीला आलेली पिके कुजून केली आहेत, तर पुराच्या पाण्यामुळे पिकेही वाहून गेली आहेत. काही ठिकाणी जमीनही खरवडून गेली आहे. पाच तालुक्यांत सर्वाधिक हानी असून, कोरेगाव तालुक्यातील १८ गावांतील १२०.५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस, घेवडा, सोयाबीन, स्ट्रॉबेरी, भाजीपाला यांची हानी झाली आहे. खंडाळा, महाबळेश्‍वर, खटाव तालुक्यांतील ४२ गावांतील ३२६ हेक्टरवरील कांदा, बटाटा, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे.

कऱ्हाड तालुक्यात २२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे कृषी खात्याने पंचनामे करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे

या वेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, निवास थोरात, अच्युतराव खलाटे, प्रदेश महिला सचिव धनश्री महाडिक, मनीषा पाटील, नाजीम इनामदार, मनोज तपासे, जमीन खान, अन्वर पाशाखान, ॲड. श्रीकांत चव्हाण, मालन परळकर, माधुरी जाधव, जस्मिन खान, अमोल शिंदे, संभाजी उतेकर, विजय मोरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com