Dairy Products Import : दुग्धजन्य पदार्थ आयातीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक असून राज्यातील दूध व्यवसायाला याचा मोठा फटका बसेल.
Dairy
Dairy Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थ आयात (Dairy Product Import) करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Dairy Farmer) घातक असून राज्यातील दूध व्यवसायाला (Dairy Business) याचा मोठा फटका बसेल.

त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना पवारांनी पत्रही पाठवले असून तसे ट्विट केले आहे.

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा लोणी आणि तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा हेतू आहे. यासंदर्भात केंद्राचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल, असे पवारांनी या पत्रात म्हटले आहे.

Dairy
Dairy Product Import: सरकारला आठवली दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची अवदसा!

या उत्पादनांच्या आयातीचा देशातील दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. दूध उत्पादक शेतकरी अलिकडेच कोविड संकटातून बाहेर आले आहेत. त्यात असा निर्णय घेतल्यास दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेवर गंभीर अडथळा निर्माण होईल, अशी भीती पवार यांनी पत्रात नमूद केली आहे.

Dairy
Dairy Product Import : केंद्र सरकार करणार लोणी आणि तुपाची आयात?

या प्रकरणाकडे लक्ष दिल्यास आणि मंत्रालयाने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या कोणताही निर्णय घेण्यापासून परावृत्त केल्यास मला आनंद होईल, असेही पवारांनी पत्रात म्हटले आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीच्या आधारे शरद पवार यांनी ट्विट करण्याऐवजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्र्यांकडून किंवा सचिवांकडून माहिती घ्यायला हवी होती. लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात दुधाचे संकलन घटले आहे.

मात्र, महाराष्ट्रात फारसा फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातील घराघरात तूप बनविले जाते. अन्य राज्यांच्या तुलनेत लोणी जास्त खाल्ले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही. शरद पवार यांच्यासारख्या १० वर्षे केंद्रात मंत्री राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याने माहिती घेऊन ट्विट करायला हवे होते.

- राधाकृष्ण विखे- पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com