दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय कायद्यानुसारच ः फडणवीस

गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो. मात्र जे नियमात आहे ते होईल. नियमांच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही,’’ असे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Dasara Melava
Dasara MelavaAgrowon
Published on
Updated on

नागपूर : ‘‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे, हे मला माहीत नाही. ते दसरा मेळावा (Dasara Melava) घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) मेळावा घेणार का हेही मला माहीत नाही. गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो. मात्र जे नियमात आहे ते होईल. नियमांच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही,’’ असे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

Dasara Melava
Soybean : सोयाबीनचा पेरा घटला; दर काय राहतील?

फडणवीस शनिवारी (ता.२७) नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाची स्थिती बुडत्या जहाजासारखी आहे. ज्या लोकांना हे माहिती पडले आहे, की या जहाजाला आता वाचवता येणार नाही. त्यामुळे असे लोक पक्ष सोडत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत, जे की योग्य आहेत. शेवटी हा त्यांचा निर्णय आहे आणि काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यावर आता मी जास्त बोलणं योग्य नाही.’’

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘विनाश काले विपरीत बुद्धी. आता करायला काहीच नसल्यामुळे काहीतरी केल्यासारखे दाखवण्याचा हा प्रकार आहे.’’ ‘‘विधान परिषदेत पैशाचा गैरव्यवहार झाला, या बाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारले. त्यावर ‘‘ते काय बोलले, याची मला कल्पना नाही. माहिती घेतल्याशिवाय बोलणे योग्य होणार नाही,’’ असे फडणवीस म्हणाले. अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्याबाबतही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com