Damaged Road : तीन तालुके जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

मोहोळ- बार्शी या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गाची दुरवस्था झाली आहे. बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावाला जोडणाऱ्या बार्शी-मोहोळ व माढा-वैराग या चारही रस्त्याची चाळण झाल्याने मालवंडीसह अनेक गावांचा विकास खुंटला आहे.
Damaged Road
Damaged RoadAgrowon

सासुरे : मोहोळ- बार्शी या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गाची दुरवस्था (Damaged Road) झाली आहे. बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावाला जोडणाऱ्या बार्शी-मोहोळ व माढा-वैराग या चारही रस्त्याची चाळण झाल्याने मालवंडीसह अनेक गावांचा विकास (Village Development) खुंटला आहे.

Damaged Road
Road Accident : रायगडमध्ये वाहतुकीसाठी गोल्डन नियमावली

मालवंडी हे गाव वैरागपासून १६ व माढा शहरापासून १६ किमी अंतरावर आहे. तसेच बार्शी व मोहोळ यांच्या मध्यावर बार्शीपासून २३ कि मी अंतरावर आहे. मालवंडी दोन्ही मार्गावरील प्रमुख गाव आहे. गावची लोकसंख्या सात हजारावर आहे.

Damaged Road
Road Development Scheme : ‘चाळीसगाव तालुक्यातील रस्त्यांना मिळणार निधी’

वैराग, माढा, मोहोळ, बार्शी ही शहरे दूर असल्याने परिसरातील इर्ले, इर्लेवाडी, सुर्डी, तुर्कपिंपरी, मानेगाव, जामगाव, केवड, उंदरगाव, गुळपोळी, कोरफळे, धानोरे, कापसेवाडी, रस्तापूर, वडाचीवाडी, तसेच आसपासच्या वाड्या-वस्त्यांची मालवंडीही बाजारपेठ आहे. शिवाय येथे आठवडी बाजार भरतो. त्यामुळे गावाचा विकास होण्यास सर्व बाबी पोषक असतानाही केवळ रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गाव विकासापासून दूर राहिला आहे.

या मार्गावरून बार्शी, तुळजापूर, कुर्डुवाडी, मोहोळमार्गे प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. वारंवार अपघात होऊन देखील याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. मागील वर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने मालवंडी येथे रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र, आश्वासन देखील रस्त्यावर पडलेल्या खड्यात गेल्याची भावना या परिसरातील नागरिकांची झाली आहे. या सर्व रस्ते तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी या परिसरात नागरिकांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com