Road Development Scheme : ‘चाळीसगाव तालुक्यातील रस्त्यांना मिळणार निधी’

चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामीण मार्गांसह जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेकडे वर्ग आहे. त्यामुळे या रस्त्यांना राज्य शासनाचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या.
Road Development
Road Development Agrowon

चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्यातील बहुतांश ग्रामीण मार्गांसह (Rural Road) जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेकडे वर्ग आहे. त्यामुळे या रस्त्यांना राज्य शासनाचा निधी (Government Fund) उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. मात्र ही गैरसोय लवकरच दूर होणार असून, विविध रस्ते विकास योजनांच्या (Road Development Scheme) माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारच्या माध्यमातून ३१ ‘इजिमा’ व ‘ग्रामा’ यांच्या एकूण ११८.९ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयदेखील आज जाहीर झाला आहे. या रस्त्यांना राज्य शासनाच्या राज्याच्या बजेटमधील निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून असलेली अडचण आता पूर्णपणे दूर होणार आहेत.

Road Development
Traditional Agriculture : शेतीतले जुने ठोकताळे आता खरे का ठरत नाहीत ?

प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती झालेल्या रस्त्यांची नावे

प्रमुख जिल्हा मार्ग : ४० ते वलठाण फाटा - ३२ नं. तांडा, शामवाडी, चितेगाव हिरापूर, अंधारी, निमखेडी, तमगव्हाण रस्ता. (१३ किमी) नवीन प्रजिमा १४२. अंधारी, शेवरी, ब्राह्मणशेवगे, देवळी भोरस, करगाव, तरवाडे, रहिपुरी रस्ता (२२.५ किमी) नवीन प्रजिमा १४३. राज्यमार्ग- २११ ते मेहुणबारे, शिदवाडी, दस्केबडी, जामदा, रहिपुरी, बोरखेडा बुद्रुक, ढोमणे फाटा, वडाळा, हिंगोणे सिम राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला मिळणारा रस्ता. (११.५ किमी) (नवीन प्रजिमा १४४).

Road Development
Agricultural Warehousing : गोदाम उभारणीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

राज्यमार्ग- २४ ते जामडी - चांभार्डी बुद्रुक- मुंदखेडा, पांतोडा, वाघळी स्टे, न्हावे बोरखेडा, बहाळ खेडगाव, गुढे ते जिल्हा हद्द रस्ता (१६.२ किमी) नवीन प्रजिमा १४५. रामा- १९ - रामनगर, लोंढे, कृष्णापुरी वरखेडे खुर्द, पिंपळवाड म्हा, टाकळी प्र. दे. देशमुखवाडी, अलवाडी, सायगाव, नांद्रे काकडणे, माळशेवगा, शेवरी, हिरापूर रस्ता. (२६ किलोमीटर) (नवीन प्रजिमा १४६).

मेहुणबारे, शिदवाडी, पोहरे, अभोणे कळमडू, जिल्हा हद्द रस्ता. (१०.२ किमी) नवीन प्रजिमा १४७. चाळीसगाव, कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर तांडा, पिंपरखेड गाव सांगवी रस्ता. (१९.५ किमी) (नवीन प्रजिमा १४८). दरम्यान, लवकरच या रस्त्यांना विविध रस्ते विकास योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com