Team Agrowon
यंदा खरिपात कडधान्य लागवड कमी झाली.
सप्टेंबर आणि ऑक्टोब महिन्यात पावसाने पिकाला फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.
यंदा पेरणीच्या काळात केंद्र सरकारने खरिपात १०५ लाख टन कडधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले होते.
पहिल्या सुधारित अंदाजात सरकारने ८४ लाख टनांवर खरिपातील कडधान्य उत्पादन स्थिरावेल, असं म्हटलंय.
खरिपातील महत्वाचं कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन यंदा ३९ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
उडीद आणि मुगाचेही उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.