Coriander Sowing : पाच हजार हेक्टरवर धने

रब्बीमध्ये इतर पिकांच्या तुलनेत कमी लागवड खर्चात धने पिकांचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत झाल्यामुळे लागवडीत वाढ होऊन ती पाच हजार हेक्टरवर पोचली आहे.
Coriander Sowing | Coriander Farming | Coriander Crop
Coriander Sowing | Coriander Farming | Coriander Crop Agrowon
Published on
Updated on

नांदेड : मागील अनेक वर्षांपासून कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असलेल्या देगलूर तालुक्यातील शेतकरी धने शेतीकडे (Coriander Farming) वळले आहेत. रब्बीमध्ये (Rabi Season) इतर पिकांच्या तुलनेत कमी लागवड खर्चात धने पिकांचे (Coriander Crop) तंत्र शेतकऱ्यांना अवगत झाल्यामुळे लागवडीत वाढ होऊन ती पाच हजार हेक्टरवर पोचली आहे. यासोबतच करडई तीन हजार हेक्टर व नव्यानेच राजमा ८१ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती देगलूर कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

लागवड खर्च कमी असल्याने देगलूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून धने शेती होत आहे. यात दरवर्षी वाढ होत असल्याची माहिती मिळाली. धने विक्रीसाठी धर्माबाद बाजारपेठ उपलब्ध असल्याने या भागातील अनेक शेतकरी धने पिकाकडे वळले आहेत. धर्माबाद बाजारात तमीळनाडू राज्यातील बिरुदनगर येथील खरेदीदार येतात.

Coriander Sowing | Coriander Farming | Coriander Crop
औरंगाबादमध्ये आठवड्यापासून मेथी, पालक, कोथिंबिर गायब

या धान्यापासून धनादाळ, धने पावडर यांसह मसाल्याच्या पदार्थात धन्याचा उपयोग होत असल्याने गावरान धने शेतीचा दरवळ तमीळनाडूपर्यंत पोहोचला आहे. कोथिंबिरीसाठी धने लागवड वर्षभर केव्हाही करता येत असली तरी धने उत्पादनासाठी मात्र रब्बी हंगाम उपयुक्त मानला जातो. गावरान जातीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. काळी कसदार जमीन आणि शेणखत टाकल्यास उत्पादन अधीक मिळते, असे शेतकरी विलास यालावर यांनी सांगितले.

Coriander Sowing | Coriander Farming | Coriander Crop
Indian Spices : भारतीय मसाल्यांना जागतीक स्तरावर महत्व

करडई, राजमा शेतीकडे कल

रब्बी पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या देगलूर तालुक्यात शेतकरी मागील काही वर्षात पीक बदल करीत आहेत. हरभरा पिकावर मर रोग येत असल्याने या पिकाची जागा धने, करडई या पिकाने घेतली आहे. यंदा देगलूर तालुक्यात २७८१ हेक्टरवर झाली आहे.

करडईपासून लाकडी घाण्यावर तेल काढून ते विक्रीचा व्यवसाय वाढला आहे. तर, राजमा पिकाची लागवडही ८१ हेक्टरवर झाल्याची माहिती कृषी सहायक श्रीमती चोंडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com