Crop Loan : खरिपात उद्दिष्टापेक्षा अधिक पीककर्ज वाटप

PDCC Bank Crop Loan : खरीप हंगामाचे जवळपास चार महिने ओलांडले आहेत. यंदा पीडीसीसी बँकेने खरीप हंगामासाठी एक हजार ८९० कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Pune News : खरीप हंगामाचे जवळपास चार महिने ओलांडले आहेत. यंदा पीडीसीसी बँकेने खरीप हंगामासाठी एक हजार ८९० कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार ७३४४ सभासदांना एक हजार ९३९ कोटी ६७ लाख ९७ हजार रुपये म्हणजेच १०२ टक्के पीककर्जाचे वाटप केले आले. यामध्ये सर्वाधिक शिरूर तालुक्यात वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात.

त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. त्यानुसार बँकेने शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

Crop Loan
Crop Loan : सांगलीतील पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप

गेल्या वर्षी खरिपासाठी एक हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी दोन लाख १६ हजार ८४८ सभासदांना एक हजार ७११ कोटी २४ लाख ७६ हजार रुपये म्हणजेच ९४ टक्के वाटप केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे.

खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे वाटप सुरू केले आहे. जिल्ह्यात बँकेचे जवळपास २९४ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते.

Crop Loan
Crop Loan : ग्रामीण बँक, जिल्हा बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे.

तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत हा कर्जपुरवठा सुरू राहणार आहे. त्यानंतर रब्बीसाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून शेती पूरक व्यवसायांनाही कर्जाचे वाटप करत आहे.

नवीन १०९० सभासदांना कर्जवाटप :

चालू वर्षी रब्बी हंगामात नव्याने झालेल्या १०९० सभासद शेतकऱ्यांनी नव्याने पीककर्ज घेतले आहे. त्यांना सुमारे ८ कोटी ३४ लाख १२ हजार रुपयांचे पिकांचे वाटप केले आहे. यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर तालुक्यांत सर्वाधिक वाटप केले आहे. त्यामुळे बँकेने ठेवलेल्या कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापेक्षा वाटप झाले आहे.

यंदा खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यातून खरिपाचे नियोजन केले आहे. आत्तापर्यंत जवळपास १०२ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत खरिपाचे पीककर्ज देण्यात येत असल्याने यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पीडीसीसी बँक, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com