Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : खानदेशात अतिपावसाने पिकांचे मातरे

खानदेशात या महिन्यात सुरुवातीपासून पाऊस सुरूच आहे. अनेक भागांत ६ ते ९ ऑक्टोबररम्यान अतिवृष्टीही झाली आहे.

जळगाव ः खानदेशात (Khandesh Rain Update) या महिन्यात सुरुवातीपासून पाऊस सुरूच आहे. अनेक भागांत ६ ते ९ ऑक्टोबररम्यान अतिवृष्टीही (Heavy Rain) झाली आहे. ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस पिकांचे मातेरे (Crop Damage) झाले आहे. पण पंचनामे कुठेही सुरू झालेले नाहीत.

Crop Damage
Crop Damage : राज्यात पिकांवर ‘परती’चे पाणी

प्रशासन वरिष्ठांचे पंचनाम्याचे आदेश नसल्याचे सांगत आहे. तसेच सर्वत्र अतिवृष्टीच झालेली नाही, अशीही बतावणी प्रशासन करीत असून, नुकसानीच्या मुद्द्यांवरून सर्वच अंग काढून घेत आहे. सप्टेंबरमध्येही खानदेशात १६ ते १९ या तारखेदरम्यान सुमारे ४० महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Crop Damage : ‘पिकं गेली माझी बुडी’

जळगाव तालुक्यातील पिंप्राळा व भोकर महसूल मंडळातही अतिवृष्टी या काळात झाली. पण या वेळेसही पंचनामे झाले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. खानदेशात सुमारे ५० हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पिकाची मोठी हानी किंवा ६० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. एकरी दोन क्विंटलही कापूस पूर्वहंगामी कापसात येणार नाही, असे दिसत आहे.

खानदेशात कापसाची सर्वाधिक लागवड आहे. सुमारे नऊ लाख हेक्टरवर लागवड झाली असून, यात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. कैऱ्या, बोंडे लाल पडून त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मका, ज्वारीचे नुकसान झाले असून, ज्वारी काळवंडू लागली आहे. लम्पी स्कीन आजाराने पशुधनाची हानी होत असतानाच अति पावसाने मोठ्या वित्तीय अडचणी शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देण्याची गरज आहे.

जळगाव जिल्ह्यात १२० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. धुळे व नंदुरबारातही पावसाने शंभरी मागील महिन्यातच गाठली होती. आताचा पाऊस आवश्यक नव्हता. कोरडवाहू कापूस पिकाची वाढ बरी असली तरी कोरड्या वातावरणाची गरज या पिकास आहे. पण या महिन्यात सतत पाऊस येतच आहे. सततच्या पावसाने अधिकची हानी झाली आहे.

खानदेशात सुमारे २० हजार हेक्टरवरील ज्वारीची हानी झाली आहे. तसेच उभ्या सोयाबीनचे किंवा कापणीवर आलेल्या सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेल्याची स्थिती आहे. पण प्रशासनाने ६० मिलिमीटरवर पाऊस या महिन्यात अपवाद वगळता झालेला नाही, असे सांगून पंचनामे सुरूच केलेले नाहीत. जमिनी वाहून जातील, तेव्हा पंचनामे व भरपाईची कार्यवाही होईल का, असा संतप्त प्रश्‍न शेतकरी करीत आहेत.

अति पावसाने कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. पण प्रशासन पंचनामे करण्यास नकार देत आहे. आपल्याकडे पंचनाम्यांचे आदेशच नाहीत, असे तलाठी सांगत आहेत. आमच्या जमिनी, पशुधन पाण्यात वाहून जाईल, तेव्हा शासन मदतीची तयारी करेल का?
अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम, (ता.यावल, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com