Hailstorm Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीचा पिकांना पुन्हा तडाखा

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बुधवारी (ता.२६) वादळी वारे आणि पावसाने पुन्हा तडाखा दिला. गुरुवारी (ता. २७) देखील दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बुधवारी (ता.२६) वादळी वारे आणि पावसाने (Unseasonal Rain) पुन्हा तडाखा दिला. गुरुवारी (ता. २७) देखील दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावली. सततच्या पावसाने कांदा, ज्वारी, मका, सोयाबीन, हळद, केळी, आंबा, कलिंगड, पपईसह उन्हाळी पिके, भाजीपाला, फळपिकांची नासाडी (Crop Damage) झाली आहे.

परभणी-हिंगोली जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, तसेच अनेक मंडलात गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून २ ठार आणि ३ जखमी झाले.

तर ४२ जनावरे दगावली. सततच्या पावसाने उशिरा पेरणी केलेली रब्बी ज्वारी, हळद, केळी, आंबा, कांदा, भाजीपाला पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली.

परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम,पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता. हिंगोली,कळमनुरी,औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात गारपीट झाली.

Crop Damage
Hailstorm Rain In Nanded : नांदेडला पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वावी परिसरात बुधवारी (ता.२६) प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. कमी अधिक प्रमाणावर गाराही पडल्या. पावसाने कांदा, कलिंगड आदी पिकांना फटका बसला.

नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस, गारपिटीने पिकांचे नुकसान सुरूच आहे. बुधवारी (ता. २६) शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता तालुक्यांतील वादळी पाऊस झाला. वीज पडून चार जणांचे मृत्यू झाले. राहुरी तालुक्यात जोरदार वादळ व पावसाने घरांचे, पिकांचे नुकसान झाले.

Crop Damage
Hailstorm Forecast : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट'

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (ता. २६) दुपारी व रात्री वादळी वाऱ्यांसह गारपीट होऊन उन्हाळ्यात लागवड केलेली ज्वारी, सोयाबीन, कलिंगड, आंबा, केळी, पपई यांसारख्या पिकांचे नुकसान वाढले आहे. वीज पडून दोन व्यक्तीही दगावल्या.

खानदेशात वादळ, गारपिटीने पीक हानी सुरूच आहे. यातच बुधवारी (ता. २६) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत गारपीट व वादळी पाऊस झाला.

यात मका, केळी, बाजरी, ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसला. सोनाळे, पळसखेडा, जामनेर, पहूर भागात पावसाने केळी, मका, ज्वारीचे नुकसान झाले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पाऊस झाला.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : घडांसह केळीबागा उद्ध्वस्त; शिजवलेली हळदही वाया

- परभणीत २ ठार, ३ जखमी, ४२ जनावरे दगावली

- सिन्नर तालुक्यात वादळी वारे, गारपीट

- राहुरी, नेवासा, शेवगावात पावसाचा धुमाकूळ

- नगर जिल्ह्यात वीज पडून चार मृत्यू

- नांदेडमध्ये वादळी पाऊस, वीज पडून दोन ठार

- खानदेशात पाऊस, गारपिटीने पिकांची हानी

गुरुवारी मराठवाडा, विदर्भात दणका

वादळी पाऊस आणि गारपिटीने गुरुवारी (ता. २७) मराठवाडा आणि विदर्भात हजेरी लावली. दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता.

छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील बनोटी, वरठाण येथे गारपीट, तिडका शिवारात कांदा पिकाचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी वादळी पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील उदगीर, नागलगाव, कुंडाळ, गुरदाळ, कौलखेड, सुमठाणा, मांजरी, कोदळी शिवारात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तसेच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात जोरदार गारपीट झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com