Hailstorm Rain In Nanded : नांदेडला पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट

Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्याला मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस झाला.
Hailstorm Forcast
Hailstorm ForcastAgrowon

Nanded Weather News : नांदेड जिल्ह्याला मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला. यादरम्यान नांदेड तालुक्यातील लिंबगाव याशिवारात गारपीट झाली. ठराविक दिवसांनी नैसर्गिक आपत्ती ओढवत असल्याने शेतकरी धस्तावले आहेत.

Hailstorm Forcast
Hailstorm In Marathwada : गारपीटीने शेतकऱ्यांची पिकं केली उद्ध्वस्त

नांदेड जिल्ह्यात वातावरणामध्ये बदल होऊन मंगळवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली. यासोबतच अवकाळी पावसाचे आगमन होऊन अनेक भागात गारपीट झाली. पावसादरम्यान वाऱ्याचा वेग बराच होता.

यामुळे केळी, आंबा या फळ पिकांना फटका बसला आहे. पावसा दरम्यानच नांदेड तालुक्यातील निमगाव परिसरात पंधरा ते वीस मिनिटे गारपीट झाली.

या गारपिटीमुळे लिंबगाव, पोखर्णी, सोमेश्वर, राहटी, वाघी, नाळेश्वर या भागातील केळी बागांना फटका बसला आहे. तसेच आंबा पिकाचेही नुकसान झाल्याची माहिती वाघी येथील शेतकरी भगवान भोसले यांनी दिली.

मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला अवकाळी पाऊस लोहा, कंधार, नायगाव, नांदेड, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यात झाला. या पावसामुळे हळद शिजवून वळवणीस घातलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जिल्ह्यात ठराविक दिवसानंतर नैसर्गिक आपत्ती होत असल्याने शेतकरी धस्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com