
Hingoli Crop Damage : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यांतील केळी उत्पादक पट्ट्यात मंगळवारी (ता. २५) वादळी पाऊस, गारपिटीमुळे (Hailstorm) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी वादळामुळे लगडलेल्या घडांसह केळीबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच शेतात वाळवत घातलेली हळद पावसात भिजली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील येलदरी-सिद्धेश्वर आणि ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात केळीचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे या भागाची केळी उत्पादक पट्टा म्हणून ओळख आहे.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वारंगा फाटा, सुकळी वीर, जवळा पाचांळ, भाटेगाव, जांबगव्हाण, दांडेगाव, डिग्रस बुद्रुक, गोंडलवाडी, वसमत तालुक्यातील गिरगाव, परजणा, खाजमापुरवाडी, बोरगाव खुर्द, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, मुंरुबा, माळवटा आदी गावांतील केळीबागा मोडून पडल्या आहेत.
गतवर्षी जूनच्या प्रारंभी गिरगाव मंडळात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले होते. यंदा एप्रिलमध्येच पाऊस, वादळाचा तडाखा बसला आहे. कळमनुरी, वसमत तालुक्यांत केळी घडांची उतरणी सुरू आहे. अनेक केळीबागा जुलैमध्ये उतरणीस येतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.