Crop Damage : उमरगा तालुक्यात दमदार पावसाची हजेरी

उमरगा : तालुक्यातील नारंगवाडी महसुल मंडळात गुरुवारी (ता. एक) मध्यरात्रीनंतर झालेल्या दमदार पावसाने शेत-शिवारात पाणीच पाणी साचले आहे. हा पाऊस पाणी साठ्यासाठी उपयूक्त ठरणारा असला तरी पिकाचे व शेत जमिनीचे नुकसान करणारा ठरला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

उमरगा : तालुक्यातील नारंगवाडी महसुल मंडळात गुरुवारी (ता. एक) मध्यरात्रीनंतर झालेल्या दमदार पावसाने शेत-शिवारात पाणीच पाणी साचले आहे. हा पाऊस (Rain) पाणी साठ्यासाठी उपयूक्त ठरणारा असला तरी पिकाचे व शेत जमिनीचे नुकसान (Crop Damage) करणारा ठरला आहे.

Crop Damage
Crop Damage : दीर्घ खंडामुळे पिके करपली

तालुक्यात यंदा पावसाचा लहरीपणा जाणवतो आहे. गुरुवारी सांयकाळी कांही भागात ढगाळ वातावरण होते. मध्यरात्री साडेबारा ते साधारणतः दोन वाजेपर्यंत जोरदार पाऊस होता. दोन तलावाच्या सांडव्यावाटे पाणी अचानक मध्यरात्री सुरू झालेल्या दमदार पावसाने अनेकांची झोप उडाली. नारंगवाडी, नाईचाकूर, माडज, सावळसूर, बाबळसूर, जवळगा बेट, गुगळगांव, गुगळगांववाडी, वागदरी, कोरेगाव, त्रिकोळी, मुळज आदी भागातील शेत, शिवारासह नदी, नाल्यात मुबलक पाणी वाहत होते.

एक ते दोन सप्टेंबर दरम्यान झालेला महसुल निहाय पाऊस. कंसात आतापर्यंत झालेला प्रत्यक्ष पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : उमरगा - १२.८० (७२६), दाळींब - ४५.३० (७५१.२०), मुळज - ३९.८० (६९८.७०), नारंगवाडी - ४५.३० (५७५.२०), मुरूम - ४१.३० (५६५.३०).

मध्यरात्री अचानक मोठा पाऊस सुरू झाल्याने भrतीचे वातावरण होते. सुदैवाने वीज खंडित झाली नाही. गावात घराभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. -
राजवीर सtर्यवंशी- पाटील, पोलिस पाटील गुगळगांव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com