Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची संततधार कायम सुरू आहे, मात्र पूर्व भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने पूर्व भागातील अनेक तालुक्यांकडे पाठ फिरवल्याने पाण्याची परिस्थिती भर पावसाळ्यात गंभीर झाली आहे.
त्यामुळे उन्हाने तापलेली जमीन अजूनही पावसाने शांत झालेली नाही. त्यामुळे अनेक विहिरींनी तळही गाठल्याने पाण्याची टंचाई कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१) अखेर ६७ गावे व ३७ वाड्यांना ५८ ट्रॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यातील येवला, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव व सिन्नर या तालुक्यांतील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६८ गावे व ३७ वस्त्यांवर ५८ टँकर सुरू आहेत. या टँकरच्या माध्यमातून १२१ टँकरच्या फेऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्या विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सर्वाधिक गंभीर परिस्थिती येवला तालुक्यात असून ४९ गावांसाठी हे नियोजन होत आहे. तर मालेगाव व चांदवड तालुक्यातही खालोखाल परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही गंभीर झाल्याने अडचणी तर आहेतच, पण पाऊस समाधानकारक झाला नाही तर पुढील काळातही हा प्रश्न अजूनच गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही हा चिंतेचा विषय आहे.
जिल्हा परिषदेकडून २०.६७ कोटींचा टंचाई आराखडा
‘एल निनो’ हा समुद्री प्रवाह सक्रिय झाला या पार्श्वभूमीवर देशातील मॉन्सूनवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे, ही बाब विचारात घेण्यात आली होती. त्यामुळे जून-जुलै महिन्यानंतरही पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याने परिषदेने टंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला होता.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट महिन्यांसाठी २०.६७ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली होती. त्यानुसार हा पाणीपुरवठा सुरू आहे.
तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे व टँकर स्थिती
तालुका गावे वाड्या टँकर फेऱ्या लोकसंख्या
बागलाण ३ ४ ३ ११ ७,१४०
चांदवड १२ ४ ७ २४ ३१,७७२
देवळा ३ ३ ३ २ ६,१३०
मालेगाव १० ८ १३ १६ २०,८५६
नांदगाव ५ ० ८ ९ २२,१०६
सिन्नर १ ३ २ ३ ४५६
येवला ३४ १५ २२ ५६ ४३,०६९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.