Agriculture Electricity : शेतकऱ्यांवर ‘महावितरण’चे संकट

खरीप पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज झाला. मात्र वीज कंपनीचे थकीत बिल भरले नाही म्हणून लाइनमन बांधावर येऊन थकीत बिलापोटी दहा हजार भरा नाहीतर वीज कट करू, असे सांगत आहेत.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

भटाणे, जि. धुळे ः खरीप पिकाचा (Kahrif Crop) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी (Rabi Season) सज्ज झाला. मात्र वीज कंपनीचे थकीत बिल भरले नाही म्हणून लाइनमन बांधावर येऊन थकीत बिलापोटी (Agriculture Elelctricity Bill) दहा हजार भरा नाहीतर वीज कट करू, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘महावितरण’चे संकट आल्याची स्थिती आहे.

Electricity
Modern Agriculture : शेतीमध्ये आधुनिकता रुजविणे गरजेचे

अंतिम टप्प्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कापूस, ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात मोठी घट झाली. अशी दुष्काळसदृश स्थिती असतानाही खरीप गेले, पण रब्बी येईल, या अपेक्षेने परत शेतकरी जोमाने उभा झाला. खरिपाचे पीक काढून व मशागत करून शेत पेरणीसाठी तयार केले आहे.

महागडी खते, बीजवाई, मशागतीचा खर्च उभा करत कांदा, गहू, मका, हरभरा पेरणीस शेतकरी सज्ज आहे. मात्र वीज कंपनीचे थकीत बिल भरले नाही म्हणून लाइनमन बांधावर आला. थकीत बिलापोटी दहा हजार भरा नाहीतर वीज कट करण्यात येईल, असे सांगत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Electricity
Modern Agriculture : शेतीमध्ये आधुनिकता रुजविणे गरजेचे

शिरपूर तालुक्यातील वरूळ उपकेंद्रांतर्गत बागायती शेतीसाठी वीज कंपनीचे केंद्र आहे. या केंद्रातून वरूळ, भटाणे, तऱ्हाड कसबे, तऱ्हाडी, अभाणपूर, जळोद, अंतुर्ली, लोंढरे, अंतुर्ली, नवे-जुने भामपूर या गावांना वीजपुरवठा होतो. परिसरात ऊस, केळी, पपई या बारमाही पिकांबरोबरच कांदा, मका, गहू, हरभरा पिकांची लागवड होते. प्रगतीचे पीक म्हणून ऊसलागवड जास्त असे. परंतु बंद कारखाना, तोडणी मजुरांचा अभाव यामुळे नगदी पीक म्हणून येथील शेतकऱ्यांनी कापूस पिकाला प्रथम पसंती दिली आहे.

लाइनमन वरचढ अन् ‍शेतकरी हतबल

यंदा पाऊस लांबल्याने पक्व झालेला कापूस भिजून खराब झाला. उत्पन्नात मोठी घट झाली. कपाशीबरोबरच बाजरी, ज्वारी, मका या पिकांचेही मोठे नुकसान झाले. खरीप पिकाने कंबरडे मोडले तरी रब्बी पिकाच्या भांडवलासाठी शेतकरी कसाबसा उभा राहिला. बहुतेक शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे.

भांडवलाप्रमाणे शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा, मका या पिकांची पेरणी केली आणि शासनाने फर्मान सोडले, की थकीत वीजबिल भरा, अन्यथा कनेक्शन कट करा. इकडे अधिकारी शासनाचा आदेश पालन करीत वीजबिल कपात करतात. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कनेक्शन कापू नये, असा दिलेला आदेश अधिकारी धुडकावत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com