Importance Of Jowar : ज्वारीचे महत्त्व जगाला पटवून द्या

आशिया व आफ्रिका खंडांत ज्वारीचा समावेश मोठ्या प्रमाणात मानवी आहारामध्ये केला जातो. तर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ज्वारीचा वापर पशुखाद्यात होतो.
Jowar
Jowar Agrowon

संयुक्त राष्ट्र संघाने आगामी वर्ष २०२३ हे भरडधान्य वर्ष (Millet Year) म्हणून जाहीर केले आहे. भरडधान्यांमध्ये ज्वारीचा (Jowar) क्रमांक वरचा आहे. देशातील एकूण ज्वारी क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. उत्पादनदेखील (Jowar Production) देशाच्या तुलनेत ५७ टक्के इतके आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक (Jowar Crop) घेतले जाते.

Jowar
Jowar Sowing : अर्ध्याच क्षेत्रावर ज्वारीची पेरणी

ज्वारी उत्पादनामध्ये राज्यात सोलापूरसह अहमदनगर, पुणे, नाशिक, परभणी, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे आघाडीवर आहेत. ज्वारीचे मूळ स्थान पूर्व मध्य आफ्रिका, इथिओपिया असले, तरी देशात ज्वारीची भाकरी चवीने खाल्ली जाते. राज्यातील हवामान ज्वारी पिकास पोषक असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते.

Jowar
Rabi Jowar : भात, रब्बी ज्वारी पिकांत मिळवली मास्टरी

सोबत जनावरांना उत्तम प्रतीचा चारा ज्वारीपासून मिळतो. रब्बी हंगामात घेतलेल्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. बार्शी तालुक्यातील शाळू जातीची ज्वारी राज्यात सर्वोत्तम मानून चवीने खाल्ली जाते. दहा ते बारा टक्के प्रथिने असणारे हे पीक आता गरिबापाठोपाठ श्रीमंताच्या घरात देखील आवडीने खाल्ले जाते. ग्लुटेन फ्री आणि आरोग्यदायी अन्न म्हणून ज्वारीची मागणी वाढली आहे. आरोग्याबाबत जागरूक असणारी मंडळी या भरडधान्याकडे वळताना दिसतात.

जागतिक पातळीवर मक्याला पर्याय म्हणून देखील हे पीक उभे राहू लागले आहे. अलीकडे कोरोना काळात ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरडधान्याचे महत्त्व लोकांना पटले आहे. मागील दशकात ज्वारीची एकूण पेरणी, उत्पादन आणि वापर हा घटलेला होता. पण आता बदललेल्या वातावरणात ज्वारीसह भरडधान्याचे महत्त्व वाढीस लागले आहे.

जागतिक पातळीवर देखील जगाला अन्नधान्य पुरवठा करणारे देश रशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अमेरिका, भारत या देशातील कमी पाऊस व दुष्काळ यासह युद्धजन्य परिस्थिती, वाढते तापमान यामुळे कमी पावसात, कमी थंडीत येणाऱ्या ज्वारीच्या पिकाला महत्त्व आल्याशिवाय राहणार नाही. आशिया व आफ्रिका खंडांत ज्वारीचा समावेश मोठ्या प्रमाणात मानवी आहारामध्ये केला जातो.

त्याचबरोबर अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ज्वारीचा वापर पशुखाद्यात प्रामुख्याने होतो. अनेक विकसित देशात ज्वारीचा वापर हा जैवइंधनासाठी देखील केला जातो म्हणून जागतिक भरडधान्य वर्षाचे सूत्र हे अन्न, चारा व इंधन (फूड, फॉडर आणि फ्यूल) असे आहे. राज्यातील ज्वारी जागतिक पातळीवर पोहोचू शकते. जगात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते. त्याला लागणारे पाणी, अन्नद्रव्य याचा विचार केला आणि जमिनीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम पाहिल्यावर अनेक देशांत मक्याला पर्याय म्हणून ज्वारीकडे पाहिले जात आहे.

इथेनॉलसाठी ज्वारीच्या काही जातीदेखील विकसित केल्या आहेत. सोबत मानवी आहारातील ज्वारीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे मुळातच राज्यातील ज्वारीचे वाढीव क्षेत्र अजून वाढवून त्याची मागणी जर पूर्ण करता आली तर शेतकऱ्याला जादा उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होतील. ज्वारीपासून पोहे, शेवया, रवा, मैदा, माल्ट, बिअर, व्हिस्की, कडक भाकऱ्या, बिस्किटे यांसारख्या पदार्थाची निर्मितीतून अजून त्याच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल.

अधिकचा ऊर्जेचा स्रोत, तंतुमय पदार्थ, स्टार्च, प्रथिने आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणारी ज्वारी ही येणाऱ्या काळात अधिकचा दर मिळाल्यास शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. जागतिक भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने माध्यमे, विद्यापीठे, जिल्हा परिषद व शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचे महत्त्व एकूण समाजाला पटवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com