मुंबई : राज्य सरकारच्या वैधानिकतेचा तिढा (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरन्यायाधीशांच्या (CJI) सत्काराला कसे उपस्थित राहू शकतात? शिवाय सरन्यायाधीश त्यांना कसे भेटू शकतात, असा सवाल राजकीय विरोधकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयातर्फे शनिवारी (ता. १०) सरन्यायाधीश उदय ललित यांचा हॉटेल ताज पॅलेस येथे सत्कार करण्यात आला. या समारंभाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याला केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय ललित, झुमा दत्ता यांची उपस्थिती होती.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे रविवारी (ता. ११) राज्य सरकारतर्फे सरन्यायाधीश ललित यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.