Mosambi harvesting : मोसंबीवर शंखी गोगलगायीचे संकट

gogalgai niyantran: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात काही ठिकाणी गोगलगायीनेही मोसंबीवर आक्रमण सुरू केल्याने मोसंबी उत्पादकांच्या संकटात भर पडल्याची स्थिती आहे.
Mosambi
MosambiAgrowon

chhatrapati sambhaji nagar : मराठवाड्यातील महत्त्वाचे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसंबीचे उत्पादक शेतकरी होणाऱ्या फळगळीने कमालीचे त्रस्त आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगर तालुक्यात काही ठिकाणी गोगलगायीनेही मोसंबीवर आक्रमण सुरू केल्याने मोसंबी उत्पादकांच्या संकटात भर पडल्याची स्थिती आहे.

Mosambi
Mosambi Orchard : अनेक वर्षांपासून जोपासली मोसंबी जागेवर तयार केले ‘मार्केट’

मराठवाड्यात अंदाजे ६० हजार हेक्टरपर्यंत मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. त्यापैकी अंदाजे किमान ४५ हजार हेक्टर बागा उत्पादनक्षम असाव्यात. छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांमध्ये मोसंबीचे क्षेत्र जास्त आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीला तर भौगोलिक मानांकनही मिळाले आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथील मोसंबीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. प्रतिकूल स्थितीमुळे मोसंबी कायम फळगळीच्या संकटात असते ते संकट यंदाही कायम आहे. जवळपास ५ ते ३० टक्क्यांपर्यंत बागनिहाय मोसंबीची फळगळ होत असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. एकीकडे फळगळ मोठ्या प्रमाणात होत असताना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा, गारखेडा शिवारात काही भागांमध्ये गोगलगायी आता इतर पिकांबरोबर मोसंबीवरही आक्रमण करीत असल्याचे पुढे आले आहे. गळीमुळे मोठ्या प्रमाणात मोसंबीची तोड सुरू असून दरही पडल्याची स्थिती आहे.

Mosambi
Snail Preventing :शेतकऱ्यांच्या नाकी-नऊ आणणारी गोगलगाय नेमकी करते तरी काय?

शंखी गोगलगाय व्यवस्थापन प्रशिक्षण

कृषी विभाग अन् मोसंबी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तेपिंपळगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) मोसंबी शंखी गोगलगाय व्यवस्थापन या प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे  कीटकशास्त्रज्ञ डॉ. नितीन पतंगे, मंडळ कृषी अधिकारी रोहिदास राठोड, कृषी पर्यवेक्षक वर्षाराणी रसाळ, मोसंबी बागायतदार संतोष दहिहंडे, भगवान गावंडे, रामेश्वर घोरपडे आदींची उपस्थिती होती. गोगलगाय ही निशाचर असल्याने ती रात्रीच्या वेळी मोसंबी झाडावर चढून साल, पाने खाऊन नुकसान करत असल्याचे निदर्शनास आले आहे. झाडाच्या खोडास पावसाळ्याच्या सुरवातीस बोर्डोपेस्ट लावल्यास ही किड झाडावर जात नाही. यामुळे मोसंबी झाडाचा

मोसंबी वा अन्य पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे,त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुहिक उपाययोजना केल्यास या किडीचे नियंत्रण लवकरात लवकर व अधिक प्रभावीपणे करता येईल.
- डॉ संजय पाटील, प्रमुख शास्रज्ञ, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर .
आमच्या बागेत पाच टक्क्यांपर्यंत मोसंबीची गळ आहे इतर शेतकऱ्यांच्या बागेत १५ टक्क्यांपर्यंत ही गळ पोचली आहे. आसपासच्या २५ ते ३० शेतकऱ्यांच्या बागेचे शंखी गोगलगाय नुकसान करीत आहे. -
संतोष दहीहंडे, चित्तेगाव शिवार, ता. जि छत्रपती संभाजीनगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com