Team Agrowon
हल्ली शेतकरी राजा चांगलाच चिंतेत आहे. पावसाचा पडलेला खंड आणि पिकांच्या नुकसानाने त्यांची डोकदुखी वाढली आहे
अशातच सध्या गोगलगायींने शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले आहेत. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे.
सततचं ढगाळ, दमट, पावसाळी वातावरण गोगलगायीच्या प्रजननासाठी अनुकूल असल्याने प्रजनन जलद होऊन गोगलगायींची संख्या अनेक पटीने वाढते.
गोगलगायी सोयाबीन, कापूस, फळझाडे, भाजीपाला, तुती आणि विविध प्रकारच्या वनस्पती, तसेच कुजलेल्या वनस्पतिजन्य पदार्थांवर उपजीविका करतात.
त्या पानांना, फुलांना अनियमित आकाराची छिद्र पाडून पानांच्या, फुलांच्या कडा खातात. त्या रोप अवस्थेतील झाडांची कोवळी शेंडे कुरतडतात.
शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून मारा. किंवा प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड घट्ट बंद करावे.