
पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा (Chandrabhaga River) वाळवंटाची स्वच्छता करण्यात आली. एका दिवसामध्ये तब्बल दहा टन कचरा (Waste) गोळा करण्यात आला. नदी पात्राची स्वच्छता केल्याने नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
दक्षिण भारताची काशी म्हणून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. प्रथम चंद्रभागेचे स्नान करून मगच विठुरायाचे दर्शन (Vitthal Darshan) घेतात.
मात्र चंद्रभागेचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नमामि गंगेच्या धरतीवर नमामि चंद्रभागेची घोषणा केली आहे.
दरम्यान गेल्या आठ वर्षापासून ही घोषणा फक्त कागदावरच आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची दयनीयअवस्था झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
नदीपात्रातील स्वच्छतेकडे संबंधित ठेकेदार व नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचा मुद्दा धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी उचलून धरला आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चंद्रभागेच्या स्वच्छतेविषयी पत्र लिहून विनंती केली.
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनीही रुग्णालयात उपचार सुरू असताना चंद्रभागेच्या स्वच्छतेकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी लेखी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत.
चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता करावी अशी मागणी मी गेल्या आठवड्यामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विनंती पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानंतर आज नगरपालिकेने चंद्रभागा पात्राची व वाळवंटाची स्वच्छता केली आहे. वाळवंटाची नियमित स्वच्छता राहावी, यासाठी धर्मवीर आध्यात्मिक आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जातील.
-अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक आघाडी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.