मुंबई : राज्यातील पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायाला (Dairy Business) साहाय्य होण्यासाठी डेन्मार्क सरकारच्या (Denmark Government) सहकार्याने सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांची भेट घेतली.
दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर असून या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन मिळण्यासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशातील सेंटर फॉर एक्सलन्सच्या धर्तीवर हे केंद्र असेल. या केंद्राच्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीने करावयाचा दुग्ध व्यवसाय, जनावरांच्या जातींमधील सुधारणा, दुग्ध शास्त्रावर आधारित अभ्यासक्रम, प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्रांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे.
या केंद्राच्या जागा निश्चितीसाठी डेन्मार्कचे शिष्टमंडळ लवकरच भेट देऊन पाहणी करणार आहे. याशिवाय बैठकीत हरित ऊर्जा, दुग्ध व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी, शिक्षण यावर चर्चा होऊन परस्पर सहकार्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या केंद्रामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना लाभ होईल. दूध देणाऱ्या गायींच्या जातीवर संशोधन होऊन दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, जनावरांची देखभाल आणि दुग्ध व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना अद्ययावत ज्ञान मिळावे म्हणून तरुणांसह दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल.
त्यादृष्टीने संबंधितांनी प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी सूचना विखे पाटील यांनी केली. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, ‘महानंदा’चे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. शिपूरकर आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.