
Buldana News : आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट कर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत बुधवारी (ता.२६) मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या कर्जातून बँकेला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा बँकेला पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन मिळाल्याचे तेव्हा सांगितले होते.
त्यानंतर काही दिवसातच ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने व्यवसाय वृद्धीसाठी शासनाकडे ३०० कोटींचा सॉफ्ट लोनचा प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार थेट सॉफ्ट लोन मिळावे किंवा राज्य बँक देत असलेल्या सॉफ्ट लोनसाठी विनाअट थकहमी मिळावी, यासाठी आमदार डॉ. शिंगणे पाठपुरावा करीत आहेत.
बुधवारी मुंबईतील बैठकीला डॉ. शिंगणे, आमदार डॉ. संजय कुटे, सहकार सचिव राजेशकुमार, वित्तसचिव शौला ए., राजगोपाल देवरा, नितीन कटारे, आशिष सिंग, संजय देशपांडे, सौरभ विजय, सहकार आयुक्त कवडे, संतोष पाटील, जिल्हा बँकेचे प्रशासक संगमेश्वर बदनाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेने आर्थिक मदत मिळाल्यानंतर सीआर, एआर यांसह आरबीआयच्या सर्व निकषाचे पालन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.