Amravati DCC Bank : कर्ज वितरणात अमरावती जिल्हा बॅंक आघाडीवर

Crop Loan : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून आधार देण्याचे काम सुरू आहे. अमरावती जिल्हा बॅंक कर्ज वितरणामध्ये आघाडीवर आहेत.
Zilla Bank
Zilla BankAgrowon
Published on
Updated on

Farmer Loan : खरीप हंगामात अमरावती जिल्हा बॅंकेकडून उद्दिष्टाच्या ९५ टक्‍के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तब्बल ५३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप जिल्हा बॅंकेकडून करण्यात आले असून राष्ट्रीयकृत बॅंकांची मात्र यात पिछाडी राहिली आहे.

गेल्यावर्षी संततधार पाऊस व इतर कारणांमुळे खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता प्रभावित झाली होती. त्यातच कपाशी व सोयाबीनचे दर दबावात आल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. परिणामी शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर होती.

Zilla Bank
Amravati Sowing Update : अमरावती विभागात केवळ १३ टक्‍के क्षेत्रावर पेरणी

रबी हंगामही फारसा दिलासादायक राहिला नाही. हरभरा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही आले नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना आशा लागून आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर बॅंकांकडून कर्ज घेत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी चालविली आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी ८८ हजार ६३४ शेतकऱ्यांना १,०१७ कोटी रुपयांचे कर्ज वटप केले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकेच्या कर्ज वितरणाचा वाटा ५३६ कोटी इतका आहे.

राष्ट्रीयकृत व ग्रामीण बॅंकांना ८८५ कोटी रुपये वितरणाचे लक्ष्यांक असताना त्यांनी आतापर्यंत ३८ हजार ४४५ खातेदारांना ४८१.२३ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या ३४ टक्‍के इतके कर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा बॅंकेला ५६५ कोटींच्या कर्जाचे उद्दिष्ट होते. ५०१८९ खातेदारांना ५३५,७८ कोटींचे वाटप केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com