Seed Production : ‘महाबीज’कडून सोयाबीन, उडदासाठी बीजोत्पादन

Kharif Season : खरीप २०२३ हंगामा करिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थात महाबीजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद व सोयाबीन पिकाचे बिजोत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप चालू झाले आहे.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon
Published on
Updated on

Nanded News : खरीप २०२३ हंगामा करिता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थात महाबीजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद व सोयाबीन पिकाचे बिजोत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप चालू झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद जांगळेकर यांनी केले आहे.

बीजोत्पादन कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले पायाभूत बियाणे बीजोत्पादकांना महाबीजमार्फत योग्य किमतीत देण्यात येणार आहे. यानंतर पिकाचे येणारे संपूर्ण उत्पन्न महाबीज परत विकत घेणार आहे. बीजोत्पादन क्षेत्रासाठी पायाभूत उच्च दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होते.

Soybean Seeds
Seed Selling : बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

यापासून उत्पादित होणाऱ्या शेतीमाल बाजारभावापेक्षा २० टक्के ते २५ टक्के अधिकचा दर मिळत असल्याने आर्थिक फायदा होतो. बियाणे उगवणक्षमता व चांगले बियाणेचे प्रमाण या गुणवत्ता निकषावर ७५ रुपये ते १२५ रुपये प्रति क्विंटल वाढीव भाव दिला जातो.

Soybean Seeds
Home grown seeds : घरगुती बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना खर्च कमी

महाराष्ट्र शासनाची बियाणे उत्पादन सबसिडी सुद्धा नवीन वाणांना देण्यात येते. त्याचाही फायदा बियाणे उत्पादकांना होत असतो. एका गावात सर्व पिके मिळून २५ एकर एवढे सीड प्लॉट असणे आवश्यक आहे. त्याकरिता स्वसाक्षरित सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणाव्यात.

पायाभूत किंवा मूलभूत बियाण्याच्या एकूण बियाणे उपलब्धतेनुसार बीजोत्पादन कार्यक्रमाचे आवनटन करण्यात येईल. बीजोत्पादन करिता उपलब्ध वान सोयाबीन जेएस-३३५, एमएयूएस -१५८, केडीएस-७२६, एमएयूएस -६१२ व उडीद टीएयू-१ या वाणाची बियाणे उपलब्ध आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com