Seed Production : आदिवासी भागात होणार नागली, वरईच्या सुधारित वाणांचे बीजोत्पादन

Nagali Varai Seed : देशात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असताना इतर पौष्टिक तृणधान्यांच्या प्रमाणात नागलीचा पेरा व क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

Nashik News : जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्‍वर व सुरगाणा तालुक्यांतील आदिवासी भागांत नागली, वरई उत्पादन होते. यासाठी सुधारित वाणांची उपलब्ध होण्यासाठी ‘महाबीज’ व ‘बिलिप्स’ संस्थेच्या वतीने बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘महाबीज’कडून करण्यात येत आहे. यासाठी बिलिप्स सामाजिक संस्था शेतकऱ्यांशी संवाद व बीजोत्पादन कार्यक्रमाबद्दल जनजागृतीसाठी साह्य करत आहे.

देशात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असताना इतर पौष्टिक तृणधान्यांच्या प्रमाणात नागलीचा पेरा व क्षेत्र सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी हवामान बदल, रोग व किडीमुळे राज्यातील बहुतांशी क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित होत असते.

Agriculture
Millet Year : रेशकार्डधारकांना मिळणार २ कीलो नाचणी मोफत

त्या वेळी नागली पिकासाठी रोग व किडीला तसेच पावसाच्या अनियमितपणाला बळी न पडणाऱ्या वाणांचे बीजोत्पादन ही मुख्य गरज असल्याचे लक्षात आले. बिलिप्स संस्थेचे लक्ष्मीकांत जाधव यांनी महाबीज या शासकीय बीजोत्पादन कंपनी अधिकाऱ्यांसमोर ही समस्या मांडली होती.

त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी यांनी यासाठी सकारात्मक पावले उचलत वरिष्ठांशी संपर्क साधला. या सर्व प्रयत्नांमुळे प्रमाणित बियाण्याची गरज विचारात घेऊन शासनाचे निर्देशानुसार महाबीजद्वारे खरीप हंगामात राबविण्यात येत असलेल्या नागली आणि वरई बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

Agriculture
Millet Update : मकरा भरडधान्य आहारात का असावे?

उत्पादित बियाण्यासाठी आकर्षक खरेदी धोरण ठरविण्यात आले असून, नागली व वरई बीजोत्पादनासाठी एका गावात कमीत कमी पाच एकर क्षेत्राचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे शुल्क बियाणे उचल करताना भरावयाचे आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा तालुक्यांतील शेतकरी बांधवांनी नागली व वरई बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी ३ जूनच्या पूर्वी महाबीजच्या जिल्हा कार्यालय अथवा बिलिप्स संस्थेशी ९४२०७६२३१७ या व्हॉट्‍सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

...असा आहे बीजोत्पादन कार्यक्रम

नागली पिकात ‘फुले नाचणी’ व ‘फुले कासारी’, तर वरईमध्ये ‘फुले एकादशी’ या सुधारित वाणांचे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. बीजोत्पादन कार्यक्रमासाठी जवळपास ७० आदिवासी शेतकऱ्यांना पायाभूत बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या प्रकल्पात २२५ शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नागलीचा ६० हेक्टर, तर वरईचा २० हेक्टरवर कामकाज होणार आहे, अशी माहिती बिलिप्स संस्थेचे लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com