Vacancy In Cooperative : सहकार विभागातील रिक्त पदे भरणार

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाने घोषित केले आहे. या माध्यमातून सहकार विभागासह सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Atul Save
Atul SaveAgrowon

Vacancy In Cooperative Department नगर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाने घोषित केले आहे. या माध्यमातून सहकार विभागासह (Cooperative Department) सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे (Vacant Post In Cooperative Department) भरण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागांच्या कामाला अधिक गती मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली.

नगर येथे सहकारमंत्री सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आढावा घेतला.

सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे विशेष कार्य अधिकारी अभिजित पाटील, नाशिकचे विभागीय सहनिबंधक (प्रशासन) विलासराव गावडे, विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांची या वेळी उपस्थिती होती.

Atul Save
Atul Save : ऊसतोड मुकादमांनी फसवणूक केल्यास तत्काळ गुन्हे : सावे

मंत्री अतुल सावे म्हणाले, की अवैध सावकारीला निबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी कायद्याची जिल्ह्यात काटेकोरपणे बजावणी करत अवैध सावकाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

जिल्हा बँकेच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. ज्यांनी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतलेले आहे व ते थकलेले आहे, अशा मोठ्या कर्जदारांकडून कर्ज वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबवावी.

Atul Save
Cooperative Milk Union : राजारामबापू दूध संघ संचालकपदी विनायक पाटील

कर्जाची वसुली करत असताना शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कर्ज भरण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड ही योजना लागू करावी.

मागास बहुजन महामंडळामार्फत असलेल्या महामंडळामार्फत विविध लाभार्थ्यांच्या विविध योजनांची सामान्यांची कर्जाची प्रकरणे मंजूर करून बँकांकडे पाठविण्यात येतात.

अशी प्रकरणे बँकाकडे वर्षअखेरीस येत असल्याने ती प्रकरणे मंजुरीच बँकांकडून नकार दिला जातो त्यामुळे अशी प्रकरणी लवकर पाठवली जावीत, अशा सूचना सावे यांनी या बैठकीत केल्या आहेत

आश्रमशाळांची तपासणी

जिल्ह्यातील आश्रमशाळेस अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा मिळतात किंवा नाही याची तपासणी करावी.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करत या योजनांचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार करावा, अशा सूचना सावे यांनी या वेळी केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com