APMC Election Maharashtra : बाजार समितींच्या कारभाराच्या चाव्या कोणाकडे राहणार? आज निकाल

बाजार समित्या या ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानले जातात. बाजार समिती राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण जनता आणि शेतकरी कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
APMC Election Maharashtra
APMC Election MaharashtraAgrowon
Published on
Updated on

APMC Election Maharashtra राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान पार पडले. यापैकी ३७ बाजार समित्यांची मतमोजणी (APMC Vote Counting) शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल (APMC Election Result) आज (शनिवारी) जाहीर होणार आहेत.

बाजार समित्या या ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानले जातात. बाजार समिती राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण जनता आणि शेतकरी कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

बहुतांश ठिकाणी भाजप- शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला आहे. तर काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या तडजोडीच्या आघाड्या आपले नशिब आजमावत आहेत.

APMC Election Maharashtra
Apmc Voting Update : पाच जिल्ह्यांतील २४ बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान, उमेदवारांचे निकालाकडे लक्ष

अमरावतीमध्ये भाजपचा सुपडा साफ

अमरावती जिल्ह्यातील ६ बाजरासमित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले . यापैकी महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने बाजी मारत यश मिळवले आहे. अमरावती वगळता इतर बाजार समित्यांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

खेडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता

पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला विजय मिळवला आहे.

APMC Election Maharashtra
APMC Election Maharashtra : बाजार समित्यांच्या आजी माजी कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला ; राज्यभरात मतदान सुरू

बुलडाण्यात शिंदे गटाच्या गटांगळ्या

बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतमोजणीचा अंतिम निकाल लागला आहे. पाच पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापीत केले आहे.

संगमनेरमध्ये थोरात विखेपाटील यांच्यात लढत

संगमनेर बाजार समितीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने खाते उघडले आहे. आत्तापर्यंत थोरत गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना याच्यासमोर थोरात यांनी कडवे आव्हान उभा केल्याचे चित्र आहे.

APMC Election Maharashtra
Pune APMC Election : पुणे बाजार समितीसाठी ६७.८२ टक्के मतदान

भुसावळ बाजार समितीमध्ये शिंदे गटाच्या पॅनलाचा विजय

भुसावळ बाजार समितीत भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा १८ पैकी १५ जागांवर विजय आहे. त्यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर विजय झाला आहे.

अकोला बाजार समितीत वंचित पॅनलचा धुव्वा

अकोला बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीने सत्ता मिळवली आहे. सर्व १८ जागा जिंकत वंचित समर्थित पॅनलचा धुव्वा उडवला आहे. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या आहेत.

परळी बाजार समितीत राष्ट्रवादी आघाडीवर

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आघाडी घेतली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संघर्षात धनंजय मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाईआणि गेवराई बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर बाजारसमितीची सत्ता काँग्रेसने राखली

पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आमदार संग्राम थोपटेंनी आपला गड राखला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com