Irrigation
IrrigationAgrowon

इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया- महाराष्ट्र चाप्टरच्या अध्यक्षपदी भंडारी

इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया-महाराष्ट्र चाप्टर’च्या अध्यक्षपदी नाशिक येथील ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा.लि.कंपनीचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी यांची एकमताने निवड करण्यात आली.

नाशिक : इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया-महाराष्ट्र चाप्टर’च्या (Irrigation Association Of India) अध्यक्षपदी नाशिक येथील ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा.लि. (Drip India Irrigation pvt Ltd.)कंपनीचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी (Zumbarlal Bhandari) यांची एकमताने निवड करण्यात आली. पुणे येथे असोसिएशनची नुकतीच बैठक झाली. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.

Irrigation
Drip Irrigation: ठिबक सिंचन अनुदानात केला लाखोंचा घोटाळा

यावेळी अध्यक्ष व नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्र व इतर राज्यातील सूक्ष्म सिंचन संच उत्पादक कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते. सूक्ष्म सिंचन व्यवसायात भंडारी हे गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत. संघटनेचे मावळते अध्यक्ष सतीश शेकडे व कार्यकारिणी कार्यकाळात संघटनेमार्फत केलेल्या कामाबद्दल फिनोलेक्सचे सुनील पाटील यांनी आभार मानले.

Irrigation
Irrigation : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा

सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरकांच्या व शेतकऱ्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी तसेच महाडीबीटी व पोकरा प्रणालीत आवश्यक बदलांसंदर्भात काम करणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले. सूक्ष्मसिंचन योजना प्रभावीपणे राबविण्यासाथी असोसिएशन हे केंद्र, राज्य सरकार व उत्पादक कंपन्या यामधील दुवा असून प्रती वर्ष ३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आपण काम करू, असे प्रतिपादन उपाध्यक्ष के. एम. महामुलकर यांनी केले. यावेळी प्रास्ताविक संदीप जवळेकर यांनी केले. तर गजेंद्र यादव यांनी आभार मानले.

असोसिएशन नवनिर्वाचित प्रतिनिधींनी कृषी आयुक्तालयाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांची भेट घेतली. २०२२-२३ करिता योजना प्रभावीपणे राबवीत असल्याबाबत आभार मानले. मोते यांनी यावेळी नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.

नवीन कार्यकारिणी अशी :

शिवाजी सांगळे-उपाध्यक्ष (महिंद्रा इपीसी)

संदीप जवळेकर-सचिव (नेटाफिम इरिगेशन)

कार्यकारी समिती सदस्य

सतीश शेकडे-माजी अध्यक्ष (श्रीराम)

कमलेश दास (दास ॲग्रो)

संतोष पाटील (रिव्ह्युलिस)

गजेंद्र यादव (कोठारी)

प्रशांत जाधव (फिनोलेक्स)

प्रीतेश नाहर (पारस)

नीतेश ओत्सवाल (प्रकाश अग्रो)

विरभद्र चेंडके (इरिलिंग)

युवराज म्हाजन (महेश कृषी)

गणेश पाटील (श्री साईराम)

प्रफुल्ल वाजपेयी (पॅरागॉन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com