Radhika Mhetre
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण महिला कष्टकऱ्यांमध्ये ५५ टक्के शेतमजूर स्त्रिया आणि २४ टक्के शेतकरी स्त्रिया आहेत. (सौजन्य - ICRISAT)
२०१८ च्या आर्थिक पाहणी अहवालात पीक कापणी आधी आणि नंतर अशा सर्व प्रक्रियांसह पॅकेजिंग, मार्केटिंग या सर्व स्तरांवर महिलांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येतो.
(सौजन्य - ICRISAT)
लहान शेती असलेल्यांची उत्पादकता वाढवण्यासह ग्रामीण भागाचा कायापालट करण्यात महिलांना सक्रिय भूमिका देण्याची आवश्यकता आहे.
(सौजन्य - ICRISAT)
शेतीक्षेत्रातील महिला शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक अशा बहुआयामी भूमिका पार पाडताना दिसून येतात.
(सौजन्य - ICRISAT)
देशातील ग्रामीण महिलांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या वाट्याला येणारी लिंग- जात- धर्म- वर्ग सापेक्ष विषमता दूर करून महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. (सौजन्य - ICRISAT)
योजनांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी, तसेच मूल्यांकन अशा प्रत्येक स्तरावर ग्रामीण स्त्रियांचा सहभाग कसा वाढवता येईल, यादृष्टीने व्यापक चिंतन व्हायला पाहिजे. (सौजन्य - ICRISAT)