
Parbhani News : जिल्ह्यात यंदा खरिपासाठी जूनअखेर ६१ हजार ८१७ शेतकऱ्यांना ४५२ कोटी ५ लाख रुपये (३२.६६ टक्के) पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यात ३३ हजार ९५१ शेतकऱ्यांना १७१ कोटी १६ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज देण्यात आले आहे. एकूण २७ हजार ८६६ शेतकऱ्यांनी २८० कोटी ८९ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ८९३ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी ९४ लाख रुपये, जिल्हा बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये, खासगी बँकांना ११६ कोटी ४ लाख रुपये उद्दिष्ट दिलेले आहे. रब्बी हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ४२२ कोटी ८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये, जिल्हा बँकेला १६१ कोटी ९१ लाख रुपये, खासगी बँकांना ५४ कोटी ६३ लाख रुपये उद्दिष्ट आहे.
जूनअखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी ८ हजार ८५९ शेतकऱ्यांना ९७ कोटी ४४ लाख रुपये (१०.९१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २० हजार ७६२ शेतकऱ्यांना २०३ कोटी २५ लाख रुपये (९६.८१ टक्के), जिल्हा बँकेने ३१ हजार ६९ शेतकऱ्यांना १३८ कोटी २० लाख (८३.७९ टक्के), खासगी बँकांनी १ हजार १२७ शेतकऱ्यांना १३ कोटी १६ लाख रुपये (११.३४ टक्के) पीककर्ज वितरित केले. यात महाराष्ट्र ग्रामीण बँक आघाडीवर आहे. त्यानंतर जिल्हा बँक दुसऱ्या स्थानी आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका कर्जवितरणात पिछाडीवर आहेत.
बँकनिहाय पीककर्ज वितरण स्थिती (कोटी रुपये) ः
बँक उद्दिष्ट वितरित रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या
भारतीय स्टेट बँक ५७२.७७ ७५.४३ १३.१७ ७१०३
जिल्हा सहकारी बँक १६१.९१ १३८.२० ८३.७९ ३१०६९
महाराष्ट्र ग्रामीण बँक २०९.९४ २०३.३५ ९६.८१ २०७६२
बँक ऑफ बडोदा ६५.९७ ५.२६ ७.९८ ४२८
बँक ऑफ इंडिया ११.८२ २.२३ १८.९७ १५४
कॅनरा बँक ७९.९० ८.९० ११.१४ ६५१
सेंट्रल बँक १२.१२ ०.८८ ७.२६ ८१
इंडियन बँक २४.१४ ०.२४ ०.९९ २१
इंडियन ओव्हरसिस बँक १०.४१ २.१६ २०.७५ १८४
पंजाब नॅशनल बँक १०.८६ ०.३१ २.८५ ३१
युको बँक २३.६८ १.०८ ४.५६ १०५
युनियन बँक ऑफ इंडिया ३४.२६ ०.९५ २.९७ १०१
अॅक्सिस बँक १२.५३ ०० ०० ००
एचडीएफसी बँक ३८.२७ ०.७२ १.८८ ४४
आयसीआयसीआय बँक ३०.२१ ९.४६ ३१.३१ ६२७
आयडीबीआय बँक ३५.३ २.९८ ८.५१ ४५६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.