Bamboo Cultivation : कुडाळमध्ये ६०४ हेक्टरवर बांबू लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ९०३ शेतकऱ्यांनी ६०४ हेक्टरवर बांबू लागवड केली आहे.
Bamboo
BambooAgrowon
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ः महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (MANREGA) कुडाळ तालुक्यातील ९०३ शेतकऱ्यांनी ६०४ हेक्टरवर बांबू लागवड (Bamboo Cultivation) केली आहे. नियोजनबद्ध केलेल्या या लागवडीची पुणे जिल्हा परिषदेच्या पथकाने पाहणी केली. पुणे जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये २ हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन (Bamboo Cultivation Management) सुरू असून, त्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा होता.

Bamboo
Bamboo : संपूर्ण बांबू केंद्राद्वारे आदिवासींना मिळाला रोजगार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषद पुणेच्या वतीने मालकीच्या क्षेत्रातील पाझर तलावाचे रूपांतर अमृत सरोवरामध्ये करून पाझर तलावाशेजारी २ हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नियोजनबद्ध लागवड केलेल्या बांबूची पाहणी करण्यासाठी एक पथक पाठविले. यामध्ये सहायक गट विकास अधिकारी (नरेगा) श्रीमती स्नेहा देव, कृषी अधिकारी (नरेगा) अरुणा लांडे, कृषी अधिकारी दिनेश अडसूळ, शिवराज पाटील, यू. एम. साखरे, डॉ. बी. भालेराव, संताजी जाधव, साईराज प्रधान, योगेश भेंडेकर यासह विविध अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दीडशेहून अधिक हेक्टरवर लागवड

‘एमआरजीएस’अंतर्गत कुडाळ तालुक्यात २०१७-१८ मध्ये प्रत्यक्षात बांबू लागवडीच्या कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला थंड प्रतिसाद मिळाला, त्यानंतर मात्र कामाला गती मिळाली. २०२० आणि २१ मध्ये दीडशेपेक्षा अधिक हेक्टरवर बांबू लागवड झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com