Paddy : देशात सरासरीऐवढी भात लागवड होईल

माॅन्सून दाखल झाल्यानंतर देशात खरिपाच्या लागवडी सुरु होतात. भात हे खरिपातील महत्वाचे पीक आहे. पण जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

पुणेः देशात मागील आठवड्यापर्यंत भात लागवड (Paddy Cultivation) गेल्यावर्षीपेक्षा १७ टक्क्यांनी कमी झाली होती, असे केंद्रीय कृषी सचिव ए.के. सिंग (A. K. Sing) यांनी सांगितले. जुलै महिन्यात आता सर्वत्र चांगला पाऊस (Rain) झाला. त्यामुळे भात लागवडीही वेगाने सुरु आहेत. देशात येणाऱ्या काळात सरासरीऐवढी भात लागवड (Paddy Planting) होईल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.

Paddy Cultivation
पवन मावळात चारसूत्री भात लागवड

देशाचा मुख्य हंगाम हा खरिप आहे. परंतु खरिप पावसावर अवलंबून आहे. माॅन्सून दाखल झाल्यानंतर देशात खरिपाच्या लागवडी सुरु होतात. भात हे खरिपातील महत्वाचे पीक आहे. पण जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भात लागवडीचा वेगही कमी होता. परंतु जुलै महिन्यात देशात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनीही वेग घेतला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १ जून ते २० जुलै या काळात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस झाला.

Paddy Cultivation
Paddy : भात पिकावर रसायनांचा वापर कमी करणार

चांगला पाऊस झाल्याने भात लागवडी आता गती घेतील, असा विश्वास केंद्रीय कृषी सचिव ए.के. सिंग यांनी व्यक्त केला. सिंग यांनी सांगितले, की चालू खरिपात आत्तापर्यंत भात लागवड काहीशी कमी झाली आहे. पुर्व भारतात सुरुवातीला कमी पाऊस असल्याने लागवडी कमी झाल्या होत्या. पण आता चांगला पाऊस झाला त्यामुळे भात लागवडही वाढेल. दक्षिण भारतात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे या भागात भाताची लागवड सरासरीप्रमाणे झाली. त्यासोबतच पंजाब, हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशात भात लागवड सरासरीएवढी झाली. काही ठिकाणी पाऊस नसला तरी या भागात सिंचनावर लागवडी सुरु झाल्या आहेत, असेही सिंग यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सध्याची भात लागवडीची आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र १७ जुलैपर्यंत देशात भात लागवड १७.४ टक्क्यांनी कमी झाली होती. मागीलवर्षी याच काळात देशात १५५ लाख हेक्टरवर भात लागवड झाली होती. मात्र यंदा १२८ लाख हेक्टरवपर्यंत क्षेत्र भाताखाली आले.

भात लागवड क्षेत्र सध्या कमी असले तरी पुढील काळात लागवड वाढले, असे कृषी सचिव यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशात भात लागवड सरासरीऐवढी होईल, असा मला विश्वास आहे. अजूनही लागवड वाढण्याची शक्यता आहे. सध्या लागवडी वेगाने सुरु आहेत. तसेच देशात सर्वत्र पाऊस झाल्याने पीकही चांगले आहे. सध्या पूर्व भारतात भात लागवड कमी झाली आहे. पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशात सर्वाधिक घट झाली आहे. मात्र आता पाऊस असल्याने लागवड वाढेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com