Silk Thread : पूर्णा मार्केटमध्ये स्वंयचलित रेशीम धागा निर्मिती यंत्र कार्यान्वित होणार

रेशीम कोष मार्केटमध्ये सिल्क समग्र योजनेतून स्वयंचलित रेशीम धागानिर्मिती यंत्र (अॅटोमॅटिक रिलिंग मशिन- एआरएम) बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या स्वयंचलित यंत्रामुळे प्रतिदिन १ टन रेशीम कोषापासून निर्यातक्षम धाग्याची निर्मिती शक्य होईल.
Silk Thread
Silk ThreadAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम कोष मार्केटमध्ये (Silk Cocoon Market) सिल्क समग्र योजनेतून स्वयंचलित रेशीम धागानिर्मिती यंत्र (अॅटोमॅटिक रिलिंग मशिन- एआरएम) (Automatic Reeling Machine) बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या स्वयंचलित यंत्रामुळे प्रतिदिन १ टन रेशीम कोषापासून निर्यातक्षम धाग्याची (Export Quality Silk Thread) निर्मिती शक्य होईल.

येत्या जानेवारी महिन्यापर्यंत हे यंत्र कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. आर. कदम यांनी दिली. पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत रेशीम शेतीचा विस्तार झाला आहे.

Silk Thread
Millets year: भरडधान्यात कोणत्या पिकांचा समावेश होतो?

२०१९ मध्ये पूर्णा येथे रेशीम कोष मार्केट सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना जवळची बाजारपेठ मिळाली आहे. पूर्णा येथील समर्थ रेशीम कोष मार्केटमध्ये मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर आदी जिल्ह्यांतून रेशीम कोषाची आवक होत आहे. सध्या प्रतिदिन सरासरी १ टन रेशीम कोषाची आवक होत आहे. कर्नाटकातील बंगलोर तसेच अन्य ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी रेशीम कोष खरेदी करतात.

या मार्केटमधील सध्याच्या रेशीम धागानिर्मिती (मल्टीयन रिलिंग मशिन) यंत्राद्वारे प्रतिदिन ६० ते ७० किलो रेशीम कोषापासून धागानिर्मिती शक्य होते. या मार्केटमधून बनारस, कोलकत्ता, माल्दा आदी ठिकाणच्या विणकरांना रेशीम धाग्याचा पुरवठा केला जातो. या मार्केटमधील रेशीम कोषाची आवक वाढली आहे. त्यामुळे धागानिर्मिती यंत्राची क्षमता वाढविणे आवश्यक होते.

केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजनेअंतर्गत स्वयंचलित धागानिर्मिती यंत्रासाठी १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान आहे. या ठिकाणी स्वयंचलित धागानिर्मिती यंत्र बसविण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत स्वयंचलित धागानिर्मिती यंत्र कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यात जालना येथील मार्केटनंतर पूर्णा येथील मार्केटमध्ये कार्यान्वित होणारे दुसरे स्वयंचलित धागानिर्मिती यंत्र आहे.

या यंत्राद्वारे प्रतिदिन १ टन रेशीम कोषापासून १६० ते १७० किलो रेशीम धाग्याची निर्मिती शक्य होईल. उच्च दर्जाच्या निर्यातक्षम धाग्याची निर्मिती होईल. जास्त दर मिळतील. त्यामुळे रेशीम कोषासदेखील चांगले दर मिळतील. रेशीम उत्पादकांचा फायदा होईल, असे मार्केटचे संचालक डॉ. संजय लोलगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com