Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात कृत्रिम खतटंचाई कायम

खरिपानंतर आता रब्बी व कांदेबाग केळी लागवडीसाठी रासायनिक खतांची मागणी जिल्ह्यात आहे. ही मागणी अलीकडेच सुरू होत आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खरिपानंतर आता रब्बी व कांदेबाग केळी लागवडीसाठी (Onion Cultivation) रासायनिक खतांची मागणी (Chemical Fertilizer Demand) जिल्ह्यात आहे. ही मागणी अलीकडेच सुरू होत आहे. पण १०.,२६.२६ ची टंचाई (fertilizer Shortage) दिसत आहे. लिकींगही (Fertilizer Linking) कायम आहे.

कृषी विभागाने खरिपात खते मुबलक असल्याचा वारंवार दावा केला. परंतु खते पुरेशी बाजारात नव्हतीच. कुठेही कारवाई लिंकिंगबाबत झाली नाही. काही कृषी केंद्रांतून लिंकिंग केली जाईल, विद्राव्य खतांची विक्री करणे कायद्यानुसार गुन्हा आहे का, असे उलट प्रश्नच शेतकऱ्यांना केले जात होते.

Fertilizer
Organic Fertilizer : निर्माल्यातून करणार सेंद्रिय खताची निर्मिती

असा प्रकार अजूनही सुरू आहे. १०.२६.२६ सोबत नॅनो युरियाची लिंकिंग सुरूच आहे. तसेच इतर कंपन्यांच्या खतांसोबत विद्राव्य व इतर खतांची लिंकिंग केली जात आहे. एका १०.२६.२६ च्या गोणीसोबत १९० ते २५० रुपयांचे विद्राव्य खत काही विक्रेते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. तर काही विक्रेते नॅनो युरियाची विक्री करीत आहेत.

Fertilizer
Fertilizer : रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन

नॅनो युरियाची विक्री कृषी केंद्र किंवा कीडनाशक चालकांकडे २१० ते २२० रुपयांत सुरू आहे. परंतु खत विक्रेते १०.२६.२६ सोबत २४० रुपयात नॅनो युरिया देत आहेत. ही विक्री एमआरपीनुसार सुरू असली तरी त्यात अधिकचा नफा मिळविण्याचे कामही खत विक्रेते करीत आहेत.

कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे. आगाप लागवडीची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी खतांचा पुरेसा साठा आपल्याकडे करून घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. परंतु रब्बीतही खतटंचाईचा प्रकार सुरू आहे. जसा हंगाम सुरू होते, तशी अडवणूक सुरू केली जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभाग म्हणतो, खते मुबलक आहेत. मग लिंकिंग, नफेखोरी, खते असून न देणे हा प्रकार का सुरू आहे, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

१०.२६.२६ प्रमाणे डीएपी खताचीदेखील टंचाई बाजारात आहे. युरियादेखील नसल्याचे खत विक्रेते सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना बेसल डोससाठी युरियाची सुरुवातीला गरज असते. परंतु त्यासाठी नॅनो युरिया घ्या, असे खत विक्रेते सांगत आहेत. नॅनो युरिया लाभदायी दिसत असला तरी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार युरियाच्या गोण्या किंवा दाणेदार युरियादेखील बाजारात पुरेसा हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com