Organic Fertilizer : निर्माल्यातून करणार सेंद्रिय खताची निर्मिती

विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या निर्माल्यातून आता सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे.
Organic fertilizers
Organic fertilizersAgrowon

नागभीड, चंद्रपूर ः यंदा कर्मवीर विद्यालयाने निर्माल्य (Nirmaly) नदीपात्रात विसर्जित न करण्याचे आवाहन गणेश मंडळांना (Ganesh Mandal Visarjan 2022) केले होते. निर्माल्य शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काउट आणि राजमाता जिजाऊ गाइडच्या पथकाच्या स्वाधीन केले. विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या याच निर्माल्यातून आता सेंद्रिय खताची निर्मिती (Organic Fertilizer Production) केली जाणार आहे.

Organic fertilizers
Dhananajay Munde : शेतकरी नष्ट करण्याचे सरकारचे धोरण ः मुंडे

गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी स्काऊट मास्टर किशोर नरुले, गाइड मास्टर रजनी चिलबुले यांनी स्काउट आणि गाइड पथकाचे सर्व विद्यार्थी घेऊन सर्व गणेश मंडळानी जमा केलेला निर्माल्य गोळा केले. जवळपास चाळीस ते पन्नास किलो निर्माल्य जमा झाले.

Organic fertilizers
Online Satbara : ऑनलाइन सातबारामुळे मिळाला वनावरील हक्क

जमा झालेला निर्माल्य एक खड्डा खोदून त्यात टाकण्यात आले. त्यावर पालापाचोडा टाकून खड्डा बुजविण्यात आला. त्यातून आता सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे.

निर्माल्यामध्ये बेलपान,फूल, हार यांसह अन्य वस्तू नदी, तलावात विसर्जित केल्या जातात. त्यामुळे पाणी दूषित होते. या वस्तूंपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा मानस मनात ठेऊन स्काउट आणि गाइड पथकाकडून निर्माल्य गोळा करण्यात आले. त्यामुळे स्वच्छता मोहीम पण झाली आणि सेंद्रिय खत पण तयार होत आहे. - किशोर नरुले, स्काउट शिक्षक कर्मवीर विद्यालय, नागभीड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com