Pune APMC : बनावट व्यापाऱ्यांकडून थकीत पैसे देणे सुरू

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बनावट व्यापाऱ्यांकडून हिशोब पट्टी न करता शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारातील थकीत पैसे देण्यास सुरवात केली आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune APMC) बनावट व्यापाऱ्यांकडून (Fake Trader) हिशोब पट्टी न करता शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी विक्रीच्या (Agriculture Produce Buy Sale) व्यवहारातील थकीत पैसे देण्यास सुरवात केली आहे. या बाबत ‘डमी अडत्यांकडून (Dummy Adatiya) शेतकऱ्यांची फसवणूक’ या मथळ्याखाली सोमवारी (ता.१९) दै. ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित गाळा मालकांनी थेट शेतकऱ्यांना फोन करून थकीत पैसे गुगल-पे द्वारे जमा केले आहेत. तर दुसऱ्या व्यापाऱ्याने देखील संपर्क साधला आहे. ते ही पैसे लवकरच देतील, असे शेतकरी सिद्धार्थ कोहिनकर यांनी सांगितले.

Pune APMC
APMC Election : ‘शेतकऱ्यांना मतदाना’वरून भाजपमध्येच दोन मतप्रवाह

सिद्धार्थ कोहिनकर (रा. दोंदे, ता. खेड, जि. पुणे) हे विविध प्रकारच्या परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी पुणे बाजार समितीमधील शिवाजीराव निकम यांच्या (गाळा क्रमांक ५३५) आणि धोंडिबा पोमण (गाळा क्रमांक ४९५) या गाळ्यांवर परदेशी भाजीपाला विक्रीस पाठविला होता. मात्र त्यांचे पैसे थकले होते. या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिवाजीराव निकम यांनी थकलेली ८ हजार १६५ रुपये रक्कम गुगल पे द्वारे जमा केल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.

Pune APMC
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

तर धोंडिबा पोमण यांनी फोन करून अरेरावीची भाषा वापरत हिशोब पट्टी आहे का? अशी विचारणा केली. यावर कोहिनकर यांनी तुमच्या गाळ्यावरील व्यक्तीकडे मी व्यवहार केला आहे. पैसे देणे तुमची जबाबदारी असल्याचे सांगितल्यावर पोमण यांनी नमते घेत, हिशोब सादर करण्याची विनंती केली. तसेच पैसे दोन दिवसांत देण्याचे आश्‍वासन दिले.

‘ॲग्रोवन’मध्ये फसवणुकीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित गाळा मालक, व्यापारी आणि बाजार समिती अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. यावर लवकरच मार्ग निघेल आणि आमचे पैसे मिळतील, अशी आशा आहे.
कैलास जाधव (मोहगाव, ता. जि. नाशिक) शेतकरी.

गाळा मालकांना नोटिसा

शेतकरी फसवणुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे बाजार समितीने संबंधित गाळा मालकांना नोटिसा देऊन सात दिवसांच्या आता म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. समाधानकारक खुलासा न आल्यास परवाना रद्द करत व्यवसाय बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com