Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच पशुधनाचा मृत्यू

लौकी मांजरवाडी रस्त्यालगत काळेमळा येथील शेतकरी रामदास गेणभाऊ वाघ यांचा घराला लागून गोठा आहे. सकाळी गोठ्यात जाऊन पहिले असता गाईचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील शेतात बिबट्याच्या (Leopard) पायाचे ठसे आढळून आले आहेत.
Leopard Attack in Pune
Leopard Attack in PuneAgrowon
Published on
Updated on

महाळुंगे पडवळ, जुन्नर, जि. पुणेः लौकी (ता. आंबेगाव) आणि खामगाव (ता. जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) अनुक्रमे १ गाभण गाय, तर खामगाव येथे ३ गायी व एक म्हैस अशा ५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबट्याला (Leopard) पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

खामगाव (ता. जुन्नर) येथील शेतकरी व दुग्ध व्यावसायिक संदेश व खंडू जाधव यांच्या गोठ्यातील पशुधनावर शनिवारी (ता.९) रात्री बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे भितीचे वातावरण आहे. खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. (Leopard Attack in Mahalunge, Pune)

Leopard Attack in Pune
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

या बाबत वनविभाग तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संबंधित शेतकऱ्यांना वनविभागाकडून लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. या वेळी नीलेश घोलप, सागर घोलप, अक्षय पठारे, बाबू जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, लौकी (ता. आंबेगाव) येथे रामदास गेणभाऊ वाघ यांची दोन वर्ष वयाची गाभण गाईचा रविवारी (ता.१०) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मृत्यू झाला. लौकी मांजरवाडी रस्त्यालगत काळेमळा येथील शेतकरी रामदास गेणभाऊ वाघ यांचा घराला लागून गोठा आहे. सकाळी गोठ्यात जाऊन पहिले असता गाईचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. शेतकऱ्याचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

पाचघरवस्ती, भैरवनाथवाडी, राणूबाई मंदिर परिसर, गावठाण, दरेकरवस्ती आदी वाडीवस्त्यांवर बिबट्याने उच्छाद मांडला आहे. गेल्या १५ दिवसांत चार ठिकाणी हल्ले करून शेळी, मेंढी, पाळीव कुत्री फस्त केली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com