Drought : दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांचे जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण

Water Shortage : जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भरपाईसाठी तत्काळ नुकसान सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Drought in Maharashtra
Drought in MaharashtraAgrowon

Nashik News : जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर पेरणीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ५ लाख ९७ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे ९३ टक्के पेरा पूर्ण झाला; मात्र पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भरपाईसाठी तत्काळ नुकसान सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कृषी विभागामार्फत सोमवारी (ता. २८) अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना सन २०२३-२४ नुसार जिल्ह्यात ५ लाख ८७ हजार १५७ शेतकऱ्यांचे ३ लाख ९९ हजार २१५.१० हेक्टर क्षेत्र विम्याखाली संरक्षित झालेले आहे. जून ते २१ ऑगस्टमधील पावसातील खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.

पीकविम्यासाठी अधिसूचित पिकांचे अधिसूचित महसूल मंडळामध्ये नुकसान झाल्यास व उत्पन्नात ५० येण्याची शक्यता असल्यास हवामानातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना काढण्याची तरतूद आहे.

Drought in Maharashtra
Declare a drought : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; मनसेची निदर्शने

त्यानुसार तरतुदीनुसार ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून मूल्यमापन करणे आवश्यक आहे.त्यानुसार मंडळात १० गावांत सर्वेक्षण केले जात आहे. त्यानुसार सोयाबीन, भात, बाजरी, भुईमूग, तूर, उडीद, कापूस, खुरासणी, खरीप ज्वारी, नाचणी, मका व खरीप कांदा अशा पिकांची वेगवेगळ्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणच्या पिकाची पाहणी याच्छिक (रेन्डम) करून पिकाच्या नुकसानीची टक्केवारी निश्‍चित करणे, तसेच याबाबत आवश्यक अहवाल छायाचित्रासह सादर करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना आहेत.

Drought in Maharashtra
Drought conditions : सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : शिवसेना (ठाकरे) आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांचा व पीकविमा उतरविलेल्या कंपनीचे कर्मचारी थेट बांधावर जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. बहुतांश महसूल मंडळाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने तीन तालुक्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये आता सर्वेक्षण सुरू असून, येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होणार.

...अशी मिळेल भरपाई

कृषी विभाग व इन्शुरन्स कंपनीमार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल. पीकविमा कंपनी पात्र शेतकऱ्यांचे मागील सात वर्षांची वार्षिक उत्पन्नाची सरासरी लक्षात घेऊन भरपाई निश्‍चित करेल. त्यापैकी निकष व अटीनुसार २५ टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हाभरातील पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार क्षेत्रीय पातळीवर कामकाज सुरू असून, लवकरच अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला जाणार आहे.
- जगदीश पाटील, कृषी उपसंचालक, नाशिक विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com