
नांदेड : नायगाव तालुक्यातील कुंचली, देगलूरमधील देगलूर शहर, नांदेड तालुक्यातील नांदेड शहर, गुंडेगाव, वडगाव, बोंढार तर्फे हवेली या गावातील जनावरांमध्ये लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराची लागण झाली आहे. हा आजार लागण झालेली ही ठिकाणे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यात लम्पी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी (Khushalsingh Pardeshi) यांनी दिली.
लम्पी साथरोगाचा शिरकाव जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, नांदेड तालुक्यातील काही गावात झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना व साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी मुबलक प्रमाणात लसीची मात्रा व जनजागृतीवर भर दिला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता बाधा झालेल्या जनावरांना गोठयापासून दूर ठेवणे, गोठा स्वच्छ ठेवणे यावर भर देण्यास सांगितले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे. लम्पी रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलो मीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे
या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे.
परस्पर उपचार केल्यास कार्यवाही
लम्पी स्कीन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसारच करण्यात यावा. खासगी पदवीधारकांनी लम्पी स्कीन आजाराचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्कीन रोगाच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधे वरिष्ठांच्या चर्चेनंतर उपलब्ध करून घ्याव्यात, असेही कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.