Kharif Season : नांदगावची आणेवारी कमाल ३६ पैसे

Kharif Season Anewari : जिल्ह्यात सर्वांत कमी पर्जन्यवृष्टी झालेल्या नांदगाव तालुक्यातील प्राथमिक नजर पैसेवारी कमीत कमी ३२ पैसे ते जास्तीत जास्त ३६ पैसे अशी निघाली आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Nashik News : जिल्ह्यात सर्वांत कमी पर्जन्यवृष्टी झालेल्या नांदगाव तालुक्यातील प्राथमिक नजर पैसेवारी कमीत कमी ३२ पैसे ते जास्तीत जास्त ३६ पैसे अशी निघाली आहे. त्यात तालुक्यात ३३ गावे ३२ पैसे, ४१ गावे ही ३४ पैसे, २५ गावे ३६ पैसे अशा प्रकारे प्राथमिक नजर आणेवारी असून, मनमाड दोनची नजर आणेवारी ३३ पैसे निघाली आहे.

तालुक्यातील जवळपास शंभर गावातली खरिपातील उत्पन्नाची मोठ्या प्रमाणात आलेली घट आल्याने सप्टेंबर महिन्यातील प्राथमिक पैसे नजर आणेवारी चाळीस पैशांच्या आत आली असली तरी वीस ते पंचवीस पैसे अशीच प्राथमिक नजर आणेवारी येणे अपेक्षित असताना ती किमान चाळीस पैसे निघाल्याने नजीकच्या काळातील दुष्काळ जाहीर होण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी मात्र अनुकूल ठरली आहे.

Kharif Season
Kharif Season : खरीप गेलाच, आता रब्बीचाही वाटेना भरोसा

पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली आल्यास दुष्काळ जाहीर होण्यासाठीची स्थिती गृहीत धरून शासनाकडून तशाप्रकारे घोषणा होत असते. त्यानंतर दुष्काळी गावांमध्ये कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये सवलत, विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ, जमीन महसुलात सूट आदी उपाययोजनांना चालना दिली जाते. यासह शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान, आर्थिक मदत, पीकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारी ही खूप महत्त्वाची मानली जाते.

Kharif Season
Kharif Season : पाऊसच नाही, तर गावाकडे जाऊन करणार काय?

खरीप आणि रब्बी हे दोन महत्त्वाचे हंगाम असून, या हंगामात निघालेल्या उत्पादनावर येथील आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. या दोन्ही हंगामात महसूल प्रशासनाकडून पैसेवारी काढून झालेल्या उत्पादनाचा लेखाजोखा घेतला जातो. त्यामुळे आणेवारी वरून दुष्काळाचे मूल्यमापन केले जाणार आहे. आता डिसेंबर महिन्यातील अंतिम आणेवारी महत्त्वाची ठरणार आहे.

तालुक्यात पावसाची टक्केवारी सध्या अवघे ३८ टक्क्याची असून खरिपाचा सर्व हंगाम वाया गेल्यात जमा असल्याने आमदार सुहास कांदे यांनी कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावेत अशा सूचना संबंधितांना दिल्या होत्या त्यानुसार प्राथमिक टप्प्यातील हाती आलेले उत्पन्न गृहीत धरून प्राथमिक पैसे नजर आणेवारी जाहीर झाली आहे.

पावसाचे अत्यल्प प्रमाण व टंचाईसदृशता याचे निकष, हाती आलेले प्रत्यक्ष उत्पन्न हे लक्षात घेता तालुक्यात उपाययोजनांचा कृती आराखडा करण्याबाबत तालुक्याच्या यंत्रणेला सूचित करण्यात आले होते. त्याप्रमाणे प्राथमिक नजर पैसेवारी ४० पैशांच्या आत आली. आता दुष्काळावर मात करण्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करणार आहे.
- सुहास कांदे, आमदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com