Geographical Indication : आंबेमोहोर तांदूळ, पुरंदरचे अंजीर झळकले आता टपाल पाकिटावर

भौगोलिक मानांकन प्राप्त आंबेमोहोर तांदूळ, पुरंदर अंजीर आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ विषयावरील पुणे जिल्ह्याच्या टोमॅटो आणि अंजीर या विशेष टपाल आवरण नुकतेच करण्यात आले.
Geographical Indication
Geographical Indication Agrowon
Published on: 
Updated on: 

पुणे ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत (Swatantrata Amrit Mahotsav) टपाल विभागाच्या (Postal Department) ‘फिलेटेली’ दिनानिमित्त भौगोलिक मानांकन (Geographical Indication ) प्राप्त आंबेमोहोर तांदूळ, पुरंदर अंजीर आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ विषयावरील पुणे जिल्ह्याच्या टोमॅटो आणि अंजीर या विशेष टपाल आवरण नुकतेच करण्यात आले.

Geographical Indication
Crop Damage : परतीच्या पावसानं सर्वदूर हाहाकार उडाला | ॲग्रोवन

कार्यक्रमाला पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये, संचालक सिमरन कौर, डेक्कन फिलाटेलिक सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. अंजली दत्ता, आर्मी फिलाटेलिक सोसायटीचे खजिनदार कर्नल आर. के. चव्हाण, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाचे अप्पासाहेब काळभोर, मुळशी तालुका आंबेमोहोर संवर्धन संघाचे हरीश मेंगडे आदी उपस्थित होते.

Geographical Indication
Kharip Crop Damage : नगर जिल्ह्यात पावसाने खरिपाची पिके हिरावली

या वेळी जायभाये म्हणाले, ‘‘भौगोलिक मानांकन प्राप्त आंबेमोहोर तांदूळ, पुरंदर अंजीरचे महत्त्व विशेष टपाल पाकिटामुळे वाढणार आहे. उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत पीएमएफएमई योजनेला प्रोत्साहन मिळण्यासाठी हे विशेष टपाल पाकिट देखील काढले आहे.

हे विशेष पाकिट पुणे मुख्य टपाल कार्यालयासह पुणे सिटी पोस्ट ऑफिस आणि पुणे टपाल क्षेत्रातील नगर, बारामती, कराड, पंढरपूर, सातारा, सोलापूर आणि श्रीरामपूर येथील सर्व मुख्य टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.