Ajit Pawar : संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच

विरोधी पक्षनेते अजित पवार वक्तव्यावर ठाम
AJit Pawar
AJit Pawar Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ‘‘छत्रपती संभाजी महाराजांनी (Chatrapati Sambhaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवीरक्षण केले. त्यामुळे ते स्वराज्यरक्षकच आहेत.

मी माझ्या विधानावर ठाम आहे. ज्यांनी महापुरुषांचा अवमान केला, त्यांना जाब विचारा. आपण केलेली अवमानकारक वक्तव्ये झाकून जावीत, यासाठी भाजप आंदोलन करत आहे,’’ अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी (ता.४) केली.


विधानभवनातील पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, ‘‘मी या आधीही स्वराज्यरक्षक असाच उल्लेख केला होता.

स्वराज्यरक्षक म्हणणे म्हणजे मी चुकीचे विधान केले असे होत नाही. ते स्वराज्यरक्षक होते. मात्र, त्यांना धर्मवीर म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, हे शरद पवार यांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याचाही मी आदर करतो.’’

AJit Pawar
Ajit Pawar : पीक कंपन्यांना वठणीवर आणा; सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर पवार आक्रमक

‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडू बुद्रुकला संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६९ कोटींचा निधी दिला.

त्यावेळी मी स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असा उल्लेख केला होता. त्यानंतर सर्व सरकारी कागदपत्रांतही तसा उल्लेख आहे.

विधानसभेतील भाषणातही तसा उल्लेख केला. मात्र, राजकीय अजेंड्यासाठी माझा निषेध केला जात आहे. मी विधानसभेत भाषण केले त्यावेळी स्वातंत्र्यवीर असा उल्लेख केला.

त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे आमदार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही.’’

AJit Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांनी माल मातीमोल विकू नये : अजित पवार

‘‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांनी महापुरूषांचा अपमान केला. तो प्रकार झाकून जावा, यासाठी अधिवेशनानंतर तीन दिवसांनी भाजपला जाग आली आहे.

या सगळ्याचा मास्टरमाईंड सभागृहात नव्हता. आता आंदोलनाची सगळी स्क्रीप्टच भाजप पुरवत आहे. वरिष्ठ नेत्यांना आंदोलनाचे फोटो पाठवावे लागत आहेत. त्यामुळे मी या सगळ्याला फारशी किंमत देत नाही,’’ असेही पवार म्हणाले.


नीतेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याबाबत प्रश्न विचारला असता, ‘‘टिल्लू लोकांना मी विचारत नाही.

तसेच या आंदोलनात भाजपचा कुठलाही मोठा नेता नाही. त्यामुळे उत्तर द्यावे अशी व्यक्ती समोर दिसत नाही,’’ असेही ते म्हणाले.

‘द्वेषाचे राजकारण करू नका’
पवार म्हणाले, ‘‘मी इतिहास संशोधक नाही. इतिहासाबाबत अधिकाराने बोलणे हा संशोधकांचा प्रांत आहे. त्यामुळे त्यांनी वस्तुनिष्ठ मांडणी करावी.

त्यावरून द्वेषाचे राजकारण करू नये. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते हे संशोधकांनी मांडल्यानंतर राज्य सरकारने पुरस्कार रद्द केला.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटले जात होते. त्यामुळे छत्रपतींची प्रतिमा संकुचित केली जात होती.

त्यावरही चर्चा झाली होती. त्यामुळे मी छत्रपती संभाजी महाराजांबाबत स्वराज्यरक्षक असे संबोधले ते योग्यच होते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com