Sinnar Heavy Rain : सिन्नरच्या अतिवृष्टिग्रस्तांना मदत

सिन्नर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन अवघ्या दोन तासांत १६५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला असून घरांचे, दुकानांचे अंशत:, पूर्णत: नुकसान झाले आहे.
Sinnar Heavy Rain
Sinnar Heavy RainAgrowon

नाशिक : सिन्नर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Sinnar Heavy Rain) होऊन अवघ्या दोन तासांत १६५ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस (Record Rainfall) झाला असून घरांचे, दुकानांचे अंशत:, पूर्णत: नुकसान (Damage Due To Heavy Rainfall Sinnar) झाले आहे. या सर्व नुकसानींचे पंचनामे (Rain Damage Survey) सोमवारपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या असून, त्यानंतर या सर्व अतिवृष्टिग्रस्तांना सांगली, कोल्हापूर आणि कोकणच्या धर्तीवर मदत केली जाईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Sinnar Heavy Rain
Rain Update : ऑगस्टअखेर राज्यात १८ टक्के अधिक पाऊस

सिन्नर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते. सिन्नर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे, दुकानांचे नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. ३) महाजन यांनी सिन्नर शहरातील देवी रोड, नाशिक वेस, नेहरू चौक, गावठाण, वंजारी गल्ली या भागांना भेटी देऊन परिसराची पाहणी केली.

या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संजय मुटकुळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांसह अधिकारी, उपस्थित होते.

नदीकाठावरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री अचानक पूर आल्याने घरे, भिंती व घरसामान वाहून गेले आहे. नागरिकांना त्यांच्या कुठल्याही मालमत्तेला वाचवण्याची संधी मिळालेली नाही. शहरातील व्यापारी पेठेत मोठे पाणी शिरले असून, व्यापाऱ्यांचा माल ओला झाला आहे. प्रशानामार्फत बचाव, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com