Agriculture Work : पावसाच्या उघडिपीनंतर कोळपणीची कामे सुरू

Kharif Season 2023 : खरीप हंगामात पेरणीनंतर सुरवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने पिकांनी कशीबशी तग धरली. तर अर्ध्या तालुक्यात ढगफुटी व अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
Agriculture Work
Agriculture Work Agrowon

Latur News : तालुक्यात आठवडाभरापासून अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण हे तणाला पोषक ठरत असून, पावसाने उघडीप दिल्यानंतर आंतरमशागतीत तणनाशक फवारणीसह कोळपणीचे काम सुरू झाल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामात पेरणीनंतर सुरवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने पिकांनी कशीबशी तग धरली. तर अर्ध्या तालुक्यात ढगफुटी व अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. पूर, पिकासह शेतजमिनीचे नुकसान केले.

शासन व प्रशासनाने नुकसानीची दखल घेत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी,गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार,पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आदींनी भेटी देऊन पाहणी केली.

Agriculture Work
Agriculture Work : शेतीतील कष्ट सुरूच असतात

शासन आपतग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून २१ जुलैच्या पावसात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या, जमिनी खरडून गेल्या, पिकांचे नुकसान झाले असा कुठलाच शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आपण घेत असून या सर्व विभागाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Agriculture Work
Kharif Agriculture Work : पाऊस ओसरल्याने शेतीकामांना पुन्हा वेग

त्याचा सर्व अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देऊन मदत मिळून देऊ असे आश्वासन प्रत्यक्ष पाहणीनंतर राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील रावणकोळा मरसांगवी, अतनूर गुत्ती, घोणसी, शिवाजीनगर तांडा मेवापूर, चिंचोली आदी गावांची शेतीच्या नुकसानाची पाहणी करत संवाद साधला.

खासदार सुधाकर शृंगारे यांनीही या भागातील नुकसानीची पाहणी करत मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. महागडे बी-बियाणे,रासायनिक खतांची खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर विविध पिकांच्या कोळपणी, खुरपणी, तणनाशक फवारणीसह आंतरमशागतीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com