Abdul Sattar : निफाडला कृषीमंत्र्यांचा धावता पाहणी दौरा

निफाड तालुक्यात शनिवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : निफाड तालुक्यात शनिवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, (Grapes) कांदा (Onion) गहू, भाजीपाला मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या.

नुकसानीचे मला गांभीर्य असून मुख्यमंत्र्यांसमोर परिस्थिती मांडणार असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. मात्र त्यांनी धावता दौरा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कुंभारी (ता. निफाड) येथे मंगळवारी (ता. २१) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेची धावती पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी आपली हातबलता कृषिमंत्र्यांसमोर मांडली. राज्य सरकारने द्राक्ष पिकांना क्रॉप कव्हरसाठी अनुदान दिले असते तर ही नुकसानीची वेळ आली नसती, अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

या वेळी कृषिमंत्र्यांसमोर जिल्हा बँकेची वसुली, विजेचे भारनियमन, बँकांची वसुली यासह व्यापाऱ्यांकडून होणारी लूट असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले.

Abdul Sattar
Agriculture Minister Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी

या वेळी निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, यांसह शिवसेनेचे भाऊलाल तांबडे, प्रकाश पाटील, अनिल कुंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी विविध मागण्यांची निवेदने सादर केली.

आमच्या समस्या जाणून घेत आम्हाला ठोस शब्द द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी या वेळी मांडली. त्यावर उत्तर देताना कृषिमंत्री म्हणाले, अधिवेशन सुरू असल्याने तूर्तास काही आश्वासन देता येणार नाही.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर परिस्थिती मांडली जाईल. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.


कृषिमंत्र्यांनी दिलेली वेळ सायंकाळी ४ ची होती. मात्र ते सायंकाळी ७ वाजता अंधारात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आले.

शेतीचे प्रचंड नुकसान झालेले असताना कृषिमंत्र्यांनी रात्रीच्या अंधारात नेमके काय पाहिले, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला.

कृषिमंत्र्यांनी पुढे पंचकेश्वर, रानवड परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषी विद्यापीठांनी नवनवीन वाणांचे संशोधन करावे

‘गांजा लागवडीची परवानगी द्या’
आमच्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे. आम्ही हतबल असल्याने आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली.

गेल्या वर्षीच्या नुकसानीपोटी मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याची चौकशी करा, फक्त पंचनामे करून कागदी घोडे नाचवू नका आम्हाला दिलासा द्या, असा शेतकऱ्यांचा सूर चर्चेत पाहायला मिळाला.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
शेतकऱ्यांच्या कुठल्याही व्यथा मनापासून समजून घेण्यापेक्षा ते एकटेच बोलत राहिले. कुठल्या समस्येचा निराकरण केले नाही, तर कुठलेही शेतकऱ्यांना आश्वासन न देता उलट शेतकऱ्यांचा आवाज दाबला.

आम्ही सहा महिन्यांत काय केले, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले हेच सांगत बसले. पण आम्हाला शेतकऱ्याला काय मिळाले? कृषिमंत्र्यांना पाहणी दौरा करायचा होता तर त्यांनी दिवस असताना उजेड असताना यायला हवे होते.

द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला अशा सर्वच पिकांची पाहणी करायला हवी होती. मात्र ते इतर पिकांचे नुकसान न पाहताच निघून गेल्याने या वेळी शेतकऱ्यांनी संतप्त झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com