Land Revenue : शेतसारा लवकरच ऑनलाइन भरता येणार

जिल्ह्याच्या भूमि अभिलेख विभागाने जमीन विषयक महसूल कर अर्थात शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे.
Land Revenue
Land Revenue Agrowon
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्याच्या भूमि अभिलेख विभागाने (Land Record) जमीन विषयक महसूल कर (Agriculture Land Revenue) अर्थात शेतसारा ऑनलाइन (Online Land Revenue) भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३१४ गावांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. गाव नमुन्याची डेटा एन्ट्री करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार आहे. ऑनलाइन कर भरता येणार आहे. यासाठी आता भूमि अभिलेख विभागाने ई चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याची पद्धत वेगळी आहे.

Land Revenue
Digital Land Record : ऑनलाइन उतारे मिळणे बंद

याठिकाणी आलेल्या अडचणी सोडवून संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर आकारण्यात आला. या लहान गावांमध्ये ‘एनए’ जमिनी नसल्याने आता शहरांलगतची गावे निवडून ‘एनए’ कर सुद्धा आकारण्याच्या पर्यायाची चाचणी केली जात आहे. यासाठी तलाठ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Land Revenue
Land Dispute : शेतजमीन, मालमत्तेच्या वादात साधी माणसंसुध्दा भारी डोकं चालवतात...

शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणात होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाढतो. कर वसूल होत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरूवातीला शेतसारा ऑनलाइन भरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत गाव नमुन्याची माहिती संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे काम सुरु आहे. या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळेल. तसेच कर ऑनलाइन भरता येईल.

- संजय तेली, उपजिल्हाधिकारी, कुळ कायदा शाखा, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com