Digital Land Record : ऑनलाइन उतारे मिळणे बंद

विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी, सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा उतारा आणि ‘८ अ’ची गरज असते.
Online Satbara
Online SatbaraAgrowon

मंद्रूप/सोलापूर : डिजिटल स्वाक्षरीचे (Digital Signature) सात-बारा (Online Satbara) आणि आठ-अ हे उतारे शेतकऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत होते. पण, काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून उतारे काढण्याचा प्रयत्न केल्यास निवडलेल्या सात-बाऱ्याची डिजिटल (Digital Land Record) स्वाक्षरीची प्रक्रिया तलाठी कार्यालयात चालू आहे, असा संदेश येतो. यापुढे ऑप्शन नसल्यामुळे उतारे डाउनलोड होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.

ऑनलाइन उतारे निघणे बंद झाल्यामुळे ज्या गावातील तलाठी कार्यालयाचे कुलूप चार-पाच दिवसांपर्यंत उघडले जात नाहीत, अशा गावांतील शेतकऱ्यांनी सात-बारा कुठे मिळवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी, सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा उतारा आणि ‘८ अ’ची गरज असते.

शासनाने पाहिजे त्या ठिकाणी आणि पाहिजे त्या वेळी सातबारा उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी वेबसाइट चालू केली.

मात्र, दोन ते तीन महिन्यांपासून ऑनलाइन सात-बारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर सात-बारामधून मिळणारा शासनाचा महसूल देखील बुडत आहे.

बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या सात-बाराची माहिती तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोचलीच कशी नसावी, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

Online Satbara
Satbara Nondi : सातबारांवरील कालबाह्य २६ हजार ८०० नोंदी काढल्या
डिजिटल सात-बारा उतारे बंद असण्याचे काहीच कारण नाही. ते सुरूच असणे आवश्यक आहे. काहीतरी तांत्रिक मुद्दा असावा. माहिती घेऊन त्वरित दुरुस्ती केली जाईल.-
शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी
डिजिटल स्वाक्षरीच्या सात-बाराबद्दल आमच्याकडे जास्त माहिती उपलब्ध नसून, त्यासंदर्भात अधिक माहिती तलाठी कार्यालयात मिळू शकेल.
राजशेखर लिंबारे, तहसीलदार, अपर मंद्रूप
डिजिटल स्वाक्षरीच्या उताऱ्याचे कोणतेच काम आमच्याकडे प्रलंबित नसून, या वेबसाइटलाच तांत्रिक अडचणी असल्याने सात-बारा उतारे निघत नाहीत.
निंगप्पा कोळी, तलाठी, मंद्रूप
डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा मिळवणे खूप सोपे होते. पाहिजे त्यावेळी सात-बारा मिळवता येत होता; पण सद्य:स्थितीला डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा निघत नसल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे.
अमोल डोकडे, शेतकरी, माळकवठे
डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा बंद असल्याने बँकेचे कर्ज प्रकरण करण्यासाठी काही दिवसांपासून सात-बाराच्या शोधात फिरत आहे. तलाठी कार्यालय देखील त्यांच्या सवडीनुसार चालू असल्याने खूप अडचणी येत आहेत.-
केदार जोडमोटे, शेतकरी, मंद्रूप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com