Agriculture Department : कृषी संचालकांच्या कामांमध्ये पुन्हा बदल

Agriculture Director : कृषी आयुक्तालयातील दोन संचालकांच्या कामकाजात पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी आयुक्तालयातील दोन संचालकांच्या कामकाजात पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत. ६०० कोटी रुपयांची कृषी यांत्रिकीकरण योजना ‘विस्तार’कडून काढून घेण्यात आली आहे. ही योजना आधीप्रमाणेच आता ‘गुणनियंत्रण’ विभागाला देण्यात आली आहे.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे प्रशासकीय कामातील एक प्रयोगशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागावर लक्ष केंद्रित केले.

विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या कामकाजातही त्यांनी मोठे बदल केले. या विभागांशी वर्षानुवर्षे संलग्न असलेल्या योजना काढून घेत एकमेकांकडे सोपविण्याचा अभिनव प्रयोग आयुक्तांनी केला. तसे आदेश जारी केल्यामुळे खळबळ उडाली होती.

गेल्या सहा महिन्यांपासून गुणनियंत्रण संचालक चक्क विस्ताराच्या योजना हाताळत होते. सर्वाधिक निधी असलेली कृषी यांत्रिकीकरणाची योजना गुणनियंत्रण विभागाऐवची ‘विस्तार’कडून चालवली जात होती.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कृषी आयुक्तांकडून प्रशासकीय सुधारणा सतत केल्या जातात. त्यामुळेच गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांच्याकडून अचानक विस्तारविषयक योजना काढून घेण्यात आल्या आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : चाळीसगाव कृषी विभागात कर्मचाऱ्यांची वनवा

तसेच गुणनियंत्रण विभागाकडे आधीच्या असलेल्या विस्तारविषयक योजना इतर कोणत्याही संचालकाकडे न देता एकहाती पुन्हा विस्तार संचालकांकडे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आयुक्तांनी स्वतःहून हे बदल केले की मंत्रालयाच्या आदेशानुसार घडामोडी झाल्या, या बाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

‘संचालकांच्या बदल्या होत असताना यापूर्वी केवळ झेंडे व पाटील यांनाच संधी देण्यात आली. त्यांचीच कामे बदलण्यात आलीत व आता पुन्हा सुधारणा करतानाही याच संचालकांना सोयीनुसार योजना दिल्या गेल्या आहेत. परंतु इतर संचालकांकडे सतत दुर्लक्ष होते जाते,’ असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Agriculture Department
Agriculture Department : वीस उपसंचालकांना ‘एसएओ’पदी बढती

प्रशासकीय कामांची फेररचना करताना आयुक्तांनी आधीसारखीच स्थिती तयार केल्याबद्दल आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. ‘‘प्रक्रिया संचालक सुभाष नागरे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले यांच्याही कामाचा आढावा घेतला जात आहे.

बदल्या करताना किंवा योजनांचे पालकत्व देताना कोणाचेही व्यक्तिगत हीत पाहिले जात नाही. उलट, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असे बदल केले जातात. आवश्यकता वाटल्यास इतरांच्या कामाचाही आढावा घेतला जाईल,’’ असे हा अधिकारी म्हणाला.

गुणनियंत्रण विभाग सांभाळणार या योजना

- निविष्ठा व गुणनियंत्रणविषयक सर्व कामे.

- सर्व प्रयोगशाळांचे व्यवस्थापन.

- बियाणे उपअभियान.

- जमीन आरोग्य व्यवस्थापन.

- कृषी यांत्रिकीकरण विषयक सर्व योजना.

विस्तार विभाग सांभाळणार या योजना

- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान.

- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.

- शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे.

- ई-गव्हर्नन्स.

- खरीप व रब्बी हंगामपूर्व बैठका.

- कृषी माहिती.

- राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन, तेलबिया पिके उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासास योजना.

- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान.

- महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान.

- कृषी गणना.

- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.

- कृषी पुरस्कार, पीकस्पर्धा, कृषी जनजागृती कार्यक्रम.

- नैसर्गिक आपत्ती.

- कोरडवाहू शेती अभियान.

- फळपीक विमा योजना.

- सांख्यिकीविषयक माहिती.

- शेतकरी मासिक.

- क्रॉपसॅप.

‘गुणनियंत्रण’कडून काढल्या या योजना

- राज्य पुरस्कृत कापूस व सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना.

- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान.

- महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान.

‘विस्तार’कडून काढल्या या योजना

- कृषी यांत्रिकीकरण उपअभियान.

- राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com