Zero Tillage : कोरडवाहू शेतीत हवा शून्य मशागत तंत्राचा अवलंब

पहिल्या पिकाचे जमिनीतील अवशेष हे पुढील पिकाचे खत असते, हेच शून्य मशागत तंत्राचे सूत्र आहे. कमीत कमी मनुष्यबळावर शेती ही या तंत्राची देणगी आहे. या तंत्रामुळे शेतीमालाच्या उत्पादनाचा दर्जा सुधारतो. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व कोरडवाहू शेती टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे.
Zero Tillage
Zero TillageAgrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, देवगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी, टापरगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील शेतकरी अतुल मोहिते हे या चर्चासत्रात सहभागी झाले.

ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. चिपळूणकर म्हणाले, की शेणखत हे सर्वांत हलक्या दर्जाचे खत आहे. चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकणे चुकीचे आहे.

Zero Tillage
Agrowon Exhibition : शेतीउपयोगी माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकरी भारावले

पानांचे खत हलक्या दर्जाचे असते तर मुळे व जमिनी खालील अवशेषांचे खत उत्तम असते. कुजण्याची क्रिया जमिनीखाली व्हायला पाहिजे. पिकांची वाढ आणि कुजण्याची क्रिया सोबतच होणे आवश्यक आहे.

ही क्रिया दीर्घकाळ चालू राहिली तर सुपीकता टिकून राहते. शून्य नांगरणी तंत्राचे प्रयोग आम्ही सुरू केल्यानंतर ऊस उत्पादनात दीडपट वाढ झाली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी हे तंत्र अद्याप स्वीकारले नाही अशी खंत चिपळूणकर यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात आदिनाथ चव्हाण म्हणाले, की अत्यंत शास्त्रशुद्ध तंत्र चिपळूणकर यांनी विकसित केले. त्यांच्या प्रयोगांविषयीची सविस्तर मालिका ॲग्रोवनने प्रसिद्ध केली. त्यानंतर त्याचे पुस्तकही प्रसिद्ध केले.

युवा शेतकऱ्यांनी पुढे यावे

आपले अनुभव सांगताना शेतकरी मोहिते म्हणाले, की शून्य नांगरणी तंत्राचा अंगीकार केल्यामुळे चोपण जमिनीची सुपीकता वाढली. उत्पादनात वाढ झाली. जोशी म्हणाले, की ॲग्रोवन परिवारातीलच मी शेतकरी आहे.

चार वर्षांपासून शून्य नांगरणी तंत्राचा अवलंब करीत आहोत. कोरडवाहू शेती टिकवायची असेल तर या तंत्राखालील क्षेत्राचा विस्तार व्हायला पाहिजे. त्यासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे.

Zero Tillage
Agrowon Exhibition : शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा सन्मान

ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे वितरण या वेळी आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, प्रताप चिपळूणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

भाऊसाहेब निवदे (मच्छिंद्रनाथ चिंचोली,ता.अंबड, जि. जालना), अक्षय तनपुरे (रोहनवाडी, ता.घनसावंगी, जि. जालना), प्रवीण घनघाव (डोंगरगाव, ता.बदनापूर, जि. जालना) प्रभूराम गाडे (खनेपुरी, ता. जालना, जि. जालना),संतोष बोर्डे (देवळेगव्हाण, ता. जाफराबाद, जि. जालना), रामेश्वर गायके (भातोडी, ता. जाफराबाद, जि. जालना) यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

बी. जी. चितळे डेअरी दालनात कृत्रिम रेतन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

बी. जी. चितळे डेअरी दालनात दुधाळ जनावरे व कृत्रिम रेतन तंत्रज्ञान याबाबत माहिती सांगण्यात येत आहे. ‘एबी जीनियस’ ही अमेरिकेची कंपनी असून, भारतात ‘चितळे डेअरी’ सोबत जनावरांमध्ये कृत्रिम रेतन (वीर्यमात्रा) विषयावर कंपनीचे काम सुरू आहे.

या वीर्यमात्रेच्या वापरानंतर ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कालवडी जन्माचे प्रमाण राहत असल्याचे सिद्ध झालेले आहे.

शिवाय चितळे डेअरीची विविध उत्पादने, मुरघास, मुक्त संचार गोठा पद्धती, डेअरीच्या विविध सेवांची माहिती देण्यात येत आहे. डेअरीचे संचालक विश्‍वास चितळे, गिरीश चितळे, श्रीपाद चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दालनातील चमू कार्यरत आहे.

Zero Tillage
Agrowon Exhibition : 'भविष्यात शेती राखेल तो राजा असेल'

‘तिरुमला’च्या पशुखाद्यासह दुग्धोत्पादनासंबंधी उपयुक्त माहिती

ॲग्रोवन प्रदर्शनात असलेल्या ‘तिरुमला ॲग्रो’च्या दालनात दुग्धोत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची माहिती दिली जात आहे. या ठिकाणी सरकी ढेप मिल्की एक्सेल, शेंगदाणा ढेप प्रोटीन एक्सेल हे प्रीमियम दर्जाचे पशुखाद्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या पशुखाद्यात १२ ते १३ टक्के तेल आणि २२ ते २४ टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. या खाद्याचा वापर केल्यानंतर दूध व फॅट वाढ करणे शक्य असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.

वखार महामंडळातर्फे ‘ब्लॅाकचेन’ तंत्रज्ञानाविषयी माहिती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या दालनात भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सेवा, ब्लॉकचेन तंत्राच्या माध्यमातून घरबसल्या शेतीमाल तारण योजनेचा लाभ समजावून देण्यात येत आहे.

वखार महामंडळ हे शेतमाल व अन्य मालाची शास्त्रोक्त साठवणूक व विमा संरक्षण पुरवण्याचे काम करते. राज्यात नोंदणीकृत गोदामांचे जाळे असून, शेतकऱ्यांसाठी भाडेशुल्कात ५० टक्के सूट दिली जाते.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (एफपीओ, एफओसी) या शुल्कात २५ टक्के सूट आहे. ‘ब्लॉकचेन व ‘एनईआरएल’ च्या माध्यमातून ई-वखार पावतीवर तातडीने अल्प दरात शेतमाल तारण कर्जाची सोय उपलब्ध केली आहे.

Zero Tillage
Agrowon Exhibition : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास औरंगाबादेत शानदार प्रारंभ

‘तृप्ती हर्बल’ दालनात ‘अगरवूड’ने वेधले लक्ष

‘तृप्ती हर्बल’ कंपनीचे अगरवूडमध्ये काम सुरू आहे. अशा प्रकारचे काम करणारी पहिलीच कंपनी असल्याचा संबंधित कंपनीचा दावा आहे. वनशेतीमध्ये मोडणारे अगरवूड हे शेतकऱ्यांना सक्षम पर्याय देणारे पीक असल्याचे तृप्ती हर्बल तर्फे सांगण्यात आले. चौथ्या वर्षापासूनच शेतकऱ्याला उत्पादन मिळू शकते.

पान, साल, गाभा, मूळ, लाकूड अशा सर्व घटकांचा वापर केला जातो. या वृक्षाविषयी कंपनीच्या दालनात लागवड ते विक्रीपर्यंतची माहिती दिली जात आहे. शेतकरी स्वतः किंवा करार करून उत्पादन घेऊ शकतात.

याशिवाय चिया या ‘सुपर फूड’ बाबतही माहिती उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडून लागवडीसोबतच ‘बाय बॅक’ची सुविधा ‘तृप्ती हर्बल’ उपलब्ध करून देत असून, औरंगाबादमध्ये लवकरच केंद्र सुरू करीत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com